Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट ; पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत अवैधधंद्यांना उधाण आले असून या परिसरात दारू, मटका, जुगार अड्डे सुरू आहेत. अनेक अवैधधंदेवाल्यांचे 'कलेक्टर' संबोधल्या जाणाऱ्याशी डायरेक्ट संबंध असल्यानेही 'त्या' अवैधधंदेवर कारवाई केली जात नाही. यामुळेच या तोफखाना हद्दीत अवैध धंदे जोरात सुरू असल्याची चर्चा आहे. कदाचित या कारणामुळेच तोफखाना परिसरात बिनधास्त सुरू असणा-या अवैधधंद्याना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. तोफखाना परिसरातील अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे. पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. यात पोलिस ठाणे हद्दीत मोठी घटना घडल्यास येथे गांभीर्याने घेतले जात नाही. त्यासंबंधी घटनेबाबत दाखल पात्र म्हणूनच पाहिले जाते वास्तविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धंदे सुरू असल्याने या ठिकाणी अहमदनगर शहरातील मोठ्या गुन्हेगारांचा कायम वावर असतो परंतु याकडे तोफखाना पोलीस ठाणे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असते यात एखाद्या जुगार अड्डावरील कारवाई सोडली तर विशेषतः कोणतीही मोठी कारवाई काही दिवसांपासून केल्याचे दिसून येत नाही. यात प्रामुख्याने येथील तोफखान्याचा संबोधले जाणारा 'कलेक्टर'चे सर्व अवैध धंदेवाल्यांची सलोख्याचे संबंध असल्याने सर्वकाही तिकडेच म्हटले जाते, अशीही दबक्या आवाजात चर्चाही आहे. यामुळेच कदाचित तोफखाना परिसरात अवैध धंद्यांना उधाण आले असेल असो, परंतु यात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांनी लक्ष घालून तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील सर्व धंदे बंद करण्यासाठी उपाययोजना राबवावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.Post a Comment

0 Comments