Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जवखेडे खालसा ग्रामसेवकास वेळेत माहिती न दिल्याने कारवाईची नोटीसऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कारभाराची माहिती अधिकारात मागितलेली माहिती वेळेत न दिल्याने पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा ग्रामसेवकाला राज्य माहिती आयोगाने कारवाईची नोटीस दिली आहे.
जवखेडे खालसा येथील अमोल गवळी यांनी जवखेडे खालसा ग्रामपंचायतीचा बँक खात्याचा तपशील, गावातील शौचालय, घरकुले याचा तपशील, झाडे विकली याचा आर्थिक तपशील आणि गावातील आठवडे बाजारात किती रक्कम जमा झाली. याबाबत माहिती दि.18 जुलै 2018 मध्ये मागितली होती. परंतु तेथील जन्म माहिती अधिकार अधिकारी तथा ग्रामसेवक एन. एस. नजन यांनी वेळेत माहिती दिली नाही. त्यामुळे गवळी यांनी प्रथम अपील पाथर्डी गटविकास अधिकाऱ्याकडे केले. गटविकास अधिकाऱ्यांनी सदरची संपूर्ण माहिती देण्याबाबत ग्रामसेवकाला आदेश दिले. यानंतर गवळी यांना वेळेत माहिती मिळाली नाही. शेवटी गवळी यांनी राज्य माहिती आयोगाकडे नाशिक येथे अपील केले. त्यावर दि.10 फेब्रुवारी 2020मध्ये सुनावणी झाली. या सुनावणीत राज्य माहिती आयुक्त के. एल. बिष्णोई यांनी संबंधित ग्रामसेवकाला नोटीस काढून त्यांनी विहित मुदतीत तसेच प्रथम अपीलीय अधिकारी यांनी सांगूनही माहिती दिली नाही. त्यामुळे ग्रामसेवकावर माहिती अधिकार कायद्यान्वये शास्तीची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. गवळी यांनी मागितलेली माहिती तातडीने द्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.Post a Comment

0 Comments