Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर मोटारसायकल व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वाहनांचीच गर्दी

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शेवगाव - शेवगाव गेवराई राज्यमार्गावर मोटारसायकल व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर या वाहनांचा सुकळी येथे झालेल्या अपघातात माध्यमिक शिक्षक अश्रिनाथ बापूराव जरे जबर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने शेवगावला हलविले मात्र उपचार सुरू असतानाच निधन झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील सुकळी येथे रस्त्याने अश्रीनाथ बापूराव जरे हे मोटारसायकल क्र एम एच १६एबी ११७६ बोधेगाव कडे जात असताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा ट्रॉलीला जबर अपघात होऊन गोळेगाव येथील भगवान विद्यालयातील विद्यार्थी प्रेमी व लोकप्रिय शिक्षक अश्रिनाथ जरे हे शेतातून बोधेगावकडे घरी येत असताना झालेल्या विचित्र अपघातात जबर जखमी झाले सदर घटना शुक्रवारी सायंकाळी 6च्या सुमारास घडली आहे मात्र ते जागीच काहीवेळ जखमी अवस्थेत पडले होते. त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामस्थांनी शेवगावला तातडीने खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले मात्र उपचार सुरू असताना निधन झाले आहे. ऐन दीपावलीच्या धामधुमीत सदर घटना घडल्याने बोधेगाव गोळेगाव भागात शोककळा पसरली गेली आहे. अनेकांना धक्का बसला आहे रात्री उशिरा शेवगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती. सदर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 
ज्ञानेश्वर, केदारेश्वर, गंगामाई वृद्धेश्वर आदी विविध साखर कारखान्याचे गळीत हंगाम जोरात सुरू झाल्याने ऊस वाहतुकीमुळे शेवगाव- गेवराई राज्य मार्ग व इतर रस्त्याने प्रवास करणे अत्यंत धोक्याचे बनले आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी अरुंद रस्ते असल्यामुळे वाहने जात असताना जनतेला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या टायरबैलगाडी, ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक आदी वाहनांची मोठी संख्या आहे. ही वाहने रात्र दिवस मुख्य रस्त्याने धावतात ऊस वाहतूक करणाऱ्या बैलटायर गाडी व ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागच्या बाजूने रेडियम रिफ्लेक्टर लावले जात नसल्याने रात्री वाहनाचा अंदाज येत नाही. तसेच वाहनांला असंख्य ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर डबल ट्रॉली लावून ऊस वाहतूक करतात व ट्रॅक्टर ड्रायव्हर मोठ मोठ्या आकाराचे साऊंड लावीत ट्रॅक्टर चालतात त्यांना मागिल ट्रॉली खाली कोणी आले की, कोणी पडला याचा काहीच अंदाज आवाजामुळे येत नाही. त्यामुळे साऊंड सिस्टीम लावून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर संबंधित साखर कारखान्याचे व पोलीस यंत्रणेचे लक्ष दिसून येत नाही प्रादेशिक वाहतूक नियंत्रण विभाग मात्र अनभिज्ञ दिसत आहे. वाहतूक नियमांचे राजरोसपणे उल्लंघन होत आहे मात्र सर्वच बघ्याची भूमिका घेत आहे संबंधित नियमबाह्य वाहनावर कायदेशीररीत्या कारवाई करण्यात यावी अशी जनतेतून जोरदारपणे मागणी होत आहे.
लहान व दुचाकी वाहन धारकांना प्रवास करताना जीव मुठीत धरून काळजी पूर्वक खबरदारीने प्रवास करावा लागत आहे सर्वच रस्ते अपघातासाठी धोकादायक बनले आहेत.
बोधेगाव परिसरातील आठवड्यातील हा चौथा अपघात आहे. तीन दिवसांपूर्वी रविवारी पाथर्डी रस्त्यावर दोन युवक जबर जखमी झाले असून त्यांच्यावर शेवगाव येथे खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
बोधेगाव येथे बन्नोमाँ दर्गा परिसरात शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरच भर रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत व व्यवसाईकांचे अतिक्रमण वाढल्याने रस्ता अरुंद झाल्यामुळे टायरबैलगाडी चालकांना दररोज मोठी कसरत करावी लागत आहे. सदर ठिकाण अपघात स्थळ बनले आहे. त्यामध्ये दिवसाआड छोटेमोठे अपघात घडतात. मात्र बोधेगाव हे मोठे बाजार पेठेचे गाव असूनही वाहतूक नियंत्रणासाठी एकही पोलीस कर्मचाऱ्यांची सध्या नेमणूक दिसत नाही. पोलिसांच्या भूमिका बद्दल नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे अपघाताची माहिती होताच संस्थेचे संस्थापक बाळासाहेब फुंदे, व्यापारी सोपान घोरतळे सह आदींनी शेवगाव कडे धाव घेतली. त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती श्री जरे यांचे शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत उल्लेखनिय काम होतं विद्यार्थी प्रेमी शिक्षक होते अनेक विद्यार्थी घडविले आहेत त्यांच्या अकाली निधनामुळे बोधेगाव परिसराचे हळहळ व्यक्त होत आहे. भर दीपावली दिवशी बोधेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले मोठा जनसमुदाय उपस्थित होत.
------------------------ 
साखर आयुक्तच्या आदेशाला साखर कारखान्याची केराची टोपली ; साखर कारखान्यांच्या गळीत सुरू झाले आहेत ऊस वाहतूक
करणा-या ट्रॅक्टर, ट्रेलर व इतर वाहनचालकांनी वाहन चालवताना मिळालेल्या परवान्याची (लायसन्स) मूळ प्रत जवळ ठेवलीच पाहिले. ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टरचे एकावेळी दोन पेक्षा जास्त ट्रेलरने वाहतूक करू नये. ट्रेलर, वाहनाची एकत्रित लांबी अठरा मीटरपेक्षा जास्त असता कामा नये. ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांच्या पाठीमागील बाजूस चार बाय चारचे रिफ्लेक्टेड बोई बसविणे गरजेचे आहे. ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टर, ट्रेलर, बैलगाडी वाहनांना महामार्गावरून
जात असताना ज्या मार्गावर सर्व्हिस रोड आहे, तेथे सर्व्हिस रोडचा वापर करण्यासाठी कारखान्यांनी सूचना दिल्या पाहिजेत. ऊस वाहन नेत असताना ट्रॅक्टरचालकाने वेगमर्यादा पाळावी, अशा कडक सूचना सर्व कारखान्यांना साखर आयुक्त यांनी दिल्या आहेत मात्र कारखाने आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. 
------------------------
संकलन - बाळासाहेब खेडकर

Post a Comment

0 Comments