Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्यावेळी विरोध केला म्हणून त्या एकास मारहाण ; सातजणांवर गुन्हा दाखल

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्यावेळी विरोध केला म्हणून त्या एकास लोखंडी पाइप व लाकडी दांडक्याने सातजणांनी जबर मारहाण केल्याची घटना नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद शिवारात घडली. याप्रकरणी संबंधित आरोपींविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दुचाकीवरून वाळकी ते अंबेराईवाडी या रस्त्याने काठवटवस्तीजवळून घरी जात होतो. यावेळी समोरून आलेल्या वाहनातून विश्वनाथ रमेश कासार, सुनील फक्कड अडसरे, विश्वजीत कासार यांचा मेहुणा आणि इतर दोन जणांनी दमदाटी करून त्यांनी त्यांच्या वाहनात मला बसून वाळकी गावाच्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याच्यावेळी तू मला विरोध केला होता व मला माझे एक लाख रुपये दे असे म्हणून त्यांनी मला मारहाण केली. परत त्यांच्या वाहनात मला बसून बाबुर्डी बेंद ते खिडकी असे दौंड ते नगर रस्त्याच्या बाजूला बाबुर्डी बेंद शिवारातील महादेव मंदिराजवळ गाडीतून उतरून दिले. तत्पूर्वी विश्वजीत कासार याने माझ्याकडे असलेला मोबाईल वरून माझी आई व माझा मित्र बाळासाहेब कासार यांच्या मोबाईलवर फोन करून ओंकार भालसिंग याला नगर दौंड रस्त्याच्या बाजूला सोडले आहे, असे म्हणून ते निघून गेले. यानंतर आई व मित्र राहुन हुसळे यांनी गाडीत घालून मला पंडित हॉस्पिटल अहमदनगर येथे अॅडमिट केले. सध्या तब्येत बरी असून मी पूर्ण शुद्धीवर आहे. विश्वजीत रमेश कासार, सुनील फक्कड अडसरे व विश्वजीत कासार त्यांचा मेहुणा व इतर चारजण यांनी अज्ञात ठिकाणी त्यांच्या गाडीतून मला घेऊन लोखंडी पाइप, लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून नगर दौंड रोडवर बाबुर्डी बेंद शिवारातील महादेव मंदिराजवळ रस्त्याच्या बाजूला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी देऊन गाडीखाली उतरून दिले असा जबाब दि. 11 नोव्हेंबर 2020 रोजी फिर्यादी ओंकार बाबासाहेब भालसिंग याने नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी याने दिला आहे. याफिर्यादीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, 143, 147,148,149, 365, 324, 323 ,504, 506 कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments