Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करावा ; राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- देशासह महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करावा, अश्या मागणीचे निवेदन अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात राष्ट्रीय वारकरी परिषदेचीवतीने मागणी करण्यात आली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, देशासह महाराष्ट्रात प्रेमाच्या नावाखाली मुली व महिलांना फसवणूक लग्नाचे आमिष दाखवून सामुहिक बलात्कार, वेश्याव्यवसाय व बळजबरीने धर्मातर या सारख्या घटना सातत्याने घटत आहे. अनेक हिंदू मुलीचे जीवन उध्वस्त होत आहे. काही मुली समोर येऊन तक्रार करतात. त्यांना धमकविणे, दबाव टाकणे असे प्रकार घडत आहेत. अनेक मुली बदनामीच्या धाकामुळे अश्लील चिञीकरण सार्वजनिक करण्याच्या धमकीमुळे अन्याय सहन करत आहेत. महाराष्ट्र ही संतांची, छञपती शिवरायाची भूमी आहे. यासाठी या गैरप्रकाराचा बंदोबस्त करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार प्रमाणे कठोर कायदा महाराष्ट्र राज्य सरकारने करावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक महाराज जाधव, सुरेखा सांगळे पाटील, संदीप महाराज जरे, राम महाराज पठाडे, शंकर महाराज भागवत, विष्णू महाराज पिठुरे, हिंदूराष्ट्र सेनेचे स्वप्निल लाहारे, कारभारी गव्हाणे आदिंच्या सह्या असणारे निवेदन देण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments