Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिवबा संघटनेच्या पदाधिका-याचा खून

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पुणे - पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे शिवबा संघटनेचे पदाधिकारी गोविंद भिकाजी कुमकर यांच्यावर अज्ञात हल्लेकोरांनी हल्ला व अपहरण करुन त्यांचा खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सुषमा गोविंद कुमकर यांनी लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानूसार पोलिसांनी हल्ला, अपहरण आणि खूनप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.


सकाळी दहाच्या सुमारास गोविंद हे घराबाहेर पडून पेरणेफाटा येथे पुणे-नगर रस्त्यालगत संतकृपा कॉम्पलेक्सच्या समोर आले होते. त्यावेळी अचानक अज्ञात चार ते पाच जणांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तसेच स्कॉर्पियो जीपमधून त्यांचे अपहरणही केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात घबरात उडाली आहे.


Post a Comment

0 Comments