Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजपच्या घंटानाद आंदोलनाने महाराष्ट्र सरकारला आली जाग ; भाजपा मध्य मंडलातर्फे सूर्यमुखी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आरती करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- महाराष्ट्र सरकारने मंदिरे उघडण्याच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीच्या मध्य मंडलाच्या वतीने नालेगाव येथील सूर्यमुखी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आरती करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 
मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलने चालू केली होती. नगर शहरही यास अपवाद नव्हता. राज्यातील सर्व दारूची दुकाने, मॉल्स, हॉटेल्स, व्यायाम शाळा, उद्याने उद्धव सरकारने चालू केलेली होती, परंतु मंदिरे उघडण्यासाठी भाजपने सुरू केलेले आंदोलन सरकारच्या जिव्हारी लागलेले होते. मंदिरे उघडण्याचे श्रेय भाजपाला जाऊ नये यासाठीच महाराष्ट्र सरकारने मंदिरे उशिरा उघडल्याचा आरोप मध्य मंडल नगर शहर चे अध्यक्ष अजय चितळे यांनी केला आहे. लॉक डाऊन मध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशात लोक डाऊन झालेला होता, पण टप्प्याटप्प्याने केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने लॉक डाऊन उठवला होता. ज्या ठिकाणी गर्दी होते असे अनेक व्यवसाय उघडण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिलेली होती, मात्र जनतेचा भावनिक विषय असलेला मंदिरे उघडण्याचा प्रश्न महाराष्ट्र सरकारने मुद्दाम प्रलंबित ठेवलेला होता. मंदिरे बंद असल्यामुळे जनसामान्य नागरिकांची ची भावना भडकायला सुरुवात झालेली होती. मंदिरे उघडण्यासाठी नागरिक वेळोवेळी सर्वच लोकप्रतिनिधींकडे मागणी करीत होते. या मागणी मुळेच भारतीय जनता पार्टी बरोबरच इतर पक्षसुद्धा मंदिरे उघडण्याची मागणी करीत होते. मंदिरे उघडण्याचा प्रश्न चिघळत चालल्याचे पाहूनच महाराष्ट्र सरकारने आज पाडव्याच्या दिवशी मंदिर उघडण्याची घोषणा केली.
यावेळी माजी नगरसेवक सुवेद्र गांधी, रचिटणीस प्रशांत मुथा, नगरसेविका सोनाली चितळे, कालिंदी केसकर, सुनील तावरे, विजय चितळे,राहुल कवडे, श्रीकांत लांडे, सुरेश लांडे, बाबू पाचारणे, श्रेयस चितळे, पियूष चितळे,यश चितळे, प्रवीण वाघ, राहुल पाखले, पिणु राऊत, शिवा मोरे, संदीप वाघ व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments