Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लाखो रुपये घेऊन लग्न करून फसवणूक करणारे रॅकेट उघडकीस ; ५ जणांना अटक

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - विवाह होत नसलेल्या श्रीमंत कुटूंबातील मुलांचा विवाह करण्यासाठी दलालांच्या माध्यमातून बाहेरच्या जिल्ह्यातील मुली दाखवयाच्या त्याचे पैसे घेऊन विवाह करून द्यायचे. यानंतर मुलगी व मुलाच्या नातेवाइकांकडून लाखो रुपये घेऊन, यावेळी प्रत्यक्षात त्याच्यासोबत संसार करायचा विश्वास संपादन झाल्यानंतर दलालास सांगून मध्यस्थामार्फत मुलीसह तिथून पळून जाण्याच्या अशा घटना नेवासा तालुक्यात उघडकीस आली होत्या. या टोळीचा  अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे व प्रभारी अधिकारी त्यागी यांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. 
 या टोळीमध्ये महिलांचा समावेश आहे.आरोपी विदर्भ व औरंगाबाद तसेच जालना जिल्ह्यातील आरोपी आहेत. हे रॆकेट उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तपासी अधिका-यांचे अभिनंदन केले आहे. अलिकडच्या काळात लग्नासाठी पैसे घेऊन लग्न करून पतीच्या घरून पोबारा करण्याच्या अनेक घटना घडत आहे. नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये नुकतीच अशी एक घटना घडली. मात्र, या घटनेतील नववधूला पळून जाताना पकडण्यात पोलिसांना यश आले व तिने सर्व हकीगत सांगितल्यानंतर लाखो रुपये घेऊन लग्न करून फसवणूक करणाऱ्या टोळीचे रॅकेट उघडकीस आले आहे
  याप्रकरणी शारदा भागाजी तनपुरे ( रा. टिटवी, ता.लोणार, जि.बुलडाणा), सागरबाई किसन डवरे (रा. लोणार, जि. बुलडाणा), मायावती नारायण चपाते (रा. जमुनानगर, जि. जालना), अनिल नाथा झिने (रा. जमुनानगर, जि. जालना) व रुपाली पांडुरंग जगताप यांना ताब्यात घेतले आहे.आरोपीना २ दिवस कोठडी मिळाली आहे
नेवासा तालुक्यातील साईनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाचे बऱ्याच दिवसांपासून लग्न जमत नव्हते. अखेर त्याला शारदा तनपुरे हिच्याकडे लग्नाकरिता मुलगी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संबंधित तरुण हा आपल्या नातेवाईकांसह मुलगी पाहण्यासाठी गेला. मुलगी पसंत झाल्यानंतर लग्न करायचे ठरले व मुलीच्या घरच्यांना लग्नासाठी दोन लाख रुपये हुंडा दिल्यानंतर संबंधित तरुणाचे ३ नोव्हेंबरला लग्न झाले. ६ नोव्हेंबरला पत्नीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला संबंधित तरुण नेवासा येथे घेऊन आला, मात्र ती नेवासा येथून गुपचूप पळून गेली. पत्नीचा शोध घेत असतानाच संबंधित तरुणाला ती पोलीस ठाण्यात सापडली. यावेळी तिच्याकडे चौकशी केली असता तिने हे लग्न तिच्या साथीदारांच्या सांगण्यावरून केले असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिचे खरे नाव रुपाली पांडुरंग जगताप असल्याचे स्पष्ट झाले. हा गुन्हा शारदा तनपुरे, सागरबाई डवरे, मायावती चपाते, अनिल झिने यांच्या मदतीने केला असल्याची कबुली तिने दिली आहे. याप्रकाराने लग्नासाठी पैसे घेऊन मुलांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी या गुन्ह्यात आणखी कोणाकोणाचा समावेश आहे, यादृष्टीने तपास सुरू केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, अभिनव त्यागी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूर यांच्या पथकातील प्रदीप शेवाळे, भरत दाते, पोलीस कर्मचारी महेश कचे, सुहास गायकवाड, वसीम इनामदार, अशोक कुदळे, भागवत शिंदे, गणेश इथापे, बाळासाहेब खेडकर यांनी केली आहे.



Post a Comment

0 Comments