Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ ग्रामस्थांच्या मागणीची वनविभागाकडून दखल ; परिसरात बिबट्या पकडण्यासाठी लावला पिंजराऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी- पाथर्डी व आष्टी तालुक्यात काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दोन्ही तालुक्यातील छोट्या मोठ्यांना बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावले असून, या परिस्थितीत चिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्याचा वावरा वाढल्याचे नागरिकांनी सरपंच धनंजय बडे पा. यांना सांगितले. यानंतर या घटनेची माहिती वनविभागास माहिती देऊन पिंजरा लावण्याची मागणी चिंचपूर पांगुळ ग्रामस्थांच्यावतीने श्री.बडे यांनी केली होती. या मागणीची दखल घेत वनविभागाने चिंचपूर पांगुळ परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे. चिंचपुर पांगुळ, जोगेवाडी, ढाकनवाडी आणि चिंचपुर परिसरात बिबट्याने अनेकांना दर्शन दिल्याने लोकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, येथील चिंचपुर पांगुळ गावात बंदरवस्ती परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार होत असल्याने बिबट्याच्या भीतीमुळे या भागातील शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,दोन दिवसांपासून सरपंच धनंजय बडे यांनी पिंजरा लावावा अशी मागणी केली होती.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याच्या मागणीची दखल घेत वारी वनविभागाने पिंजरा लावला आहे. चिंचपुर पांगुळ गावाच्या उत्तर दिशेला असणाऱ्या मळे परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असून, चार- दिवसांपूर्वी वस्तीवर कुत्र्यावर बिबट्याने झडप घातली होती माणसांनी आरडा ओरडा केल्याने कुत्र्यास सोडून तुरीच्या शेतात धूम ठोकली तसेच काल पाणी भरण्यांसाठी काही लोक गेले असता त्यांना बिबट्या दिसला, काल वस्तीवरील गुरांच्या गोठ्यात बैलावर हल्ला चढवला होता परंतु बैलाच्या ओरडण्याने माणसं बाहेर येताना दिसली असता बिबट्याने पलायन केले .गावात ऊस लागवड परिसर व मळेभाग आहे. त्या भागात अनेक वन्य पशुचे वास्तव्य आहे. या भागात बिबट्याचे अस्तित्व वारंवार सिद्ध होत असल्याने नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याची दखल घेत वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला असून, कधी एकदाचा बिबट्या जेरबंद होतो याकडे स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

संकलन : सोमराज बडेPost a Comment

0 Comments