Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर शहरात कल्याणरोडवर फटाका मार्केटमध्ये 97 प्रकारातील फटाका उपलब्ध

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनचे भव्य फटाका मार्केट नगर कल्याण रोड पेट्रोल पंपाजवळ सुरू झाले आहे. ग्राहकांना येथे उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण व विविध नामांकित कंपन्यांचे 98 फॅन्सी फटाके माफक दरात उपलब्ध आहेत, अशी माहिती फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा व सचिव संतोष बोरा यांनी दिली.
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनचे हे सर्वात मोठे फटाका मार्केट आहे. याचा फटका मार्केटमध्ये फटाका खरेदीसाठी महाराष्ट्रातील व्यापारी व ग्राहक फटाके खरेदी करण्यासाठी अहमदनगर येथे येतात असे श्री बोज्जा सांगितले.असोसिएशनचे सचिव संतोष बोरा म्हणाले की, दिवाळी होईल की नाही अशी शंका अनेकांना होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मागील वेळेस 44 दुकान होती. परंतु यावेळेस ,30 दुकाने मार्केटमध्ये आहेत. फटाका असोसिएशनच्या सभासदांना ही कोरोना त्रास झाला आहे. फटाका मार्केटमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळण्यात येत आहे. ग्राहकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता नागरिकांनी अहमदनगर फटाका मार्केटमध्ये फटाका खरेदीसाठी यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नगरच्या फटाका मार्केटमध्ये 98 प्रकारची फॅन्सी फटाके उपलब्ध आहेत. शॉर्टमध्ये 13 प्रकारची फटाके, रॉकेटमध्ये सहा प्रकार, फुलबातांमध्ये 9 प्रकार उपलब्ध आहेत. त्यावर सुपरस्टिक, बुम, गोल्डलक्ष्मी आदिंसह 98 प्रकारातील फटाके मार्केटमध्ये विक्रीसाठी वाजवी दरात उपलब्ध आहेत.

Post a Comment

0 Comments