Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फिनिक्स फाऊंडेशनच्या पुढाकाराने महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त 48 नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्प शिबीरात 178 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी ; 37 रुग्णांवर होणार मोतिबिंदू शस्त्रक्रिया

 


महात्मा फुलेंचे विचार व कार्य सर्व समाजाला दिशादर्शक -जालिंदर बोरुडे
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - शेतकरी व बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन महात्मा फुलेंनी पुरोगामी विचाराने कार्य केले. महात्मा फुलेंचे विचार व कार्य सर्व समाजाला दिशादर्शक आहे. समाजातील महापुरुषांनी वंचितांना नेहमीच आधार देण्याचे कार्य केले. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ त्यांनी रोवली. त्यांचे कार्य आजही सर्व समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे सांगून, त्यांच्याच विचाराने फिनिक्स सोशल फाऊंडेशन कार्य सुरु असल्याची भावना फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी व्यक्त केली. 
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त नागरदेवळे (ता. नगर) येथील सौरभनगर भागात मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराप्रसंगी बोरुडे बोलत होते. बोरुडे पुढे म्हणाले की, कोरोनाच्या महामारीत अनेकांचे रोजगार व नोकर्‍या गेले आहेत. गरजू घटकांना आरोग्य सुविधा मिळत नसून, त्यांच्यासाठी विविध मोफत शिबीर ठेऊन त्यांना फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून आधार देण्याचे कार्य सुरु असल्याची भावना व्यक्त केली. 
या शिबीरात 178 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तर 37 गरजू रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया होणार आहेत. तसेच फिनिक्स फाऊंडेशनच्या आवहानाला प्रतिसाद देत 48 नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प व्यक्त केला. गरजू रुग्णांना मोफत औषधे व नंबरचे चष्मे देण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी सौरभ बोरुडे, अक्षय धाडगे, विशाल गायके, गौरव बोरुडे, मोहनीराज कुरे आदींसह फाऊंडेशनचे सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments