Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्यात 3 नगरपरिषद, 65 नगरपंचायतींचा डिसेंबर 2020 मध्ये तर फेब्रुवारी 2021 मध्ये 2 नगरपरिषद, 17 नगरपंचायतींचा कालावधी संपुष्टात ; प्रभागरचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - राज्य नोव्हेंबर ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 3 नगरपरिषद व 65 नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना आरक्षण व सोडतीचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग अवर सचिव संजय सावंत यांनी जाहीर केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नगरपंचायत अकोला, कर्जत व पारनेर आणि नगरपरिषद शेवगाव, जामखेडसाठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
3 नगरपरिषद व 65 नगरपंचायतींचा डिसेंबर 2020 मध्ये कालावधी संपुष्टात येत आहे. यानंतर मुदत संपणाऱ्या या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यासाठी प्रभागरचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम याप्रमाणे असणार आहे. दि. 10 डिसेंबर 2020 ला प्राप्त हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी होणार आहे. दि. 15 डिसेंबर 2020 ला जिल्हाधिकारी यांच्याकडून हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठवणार आहेत. दि. 24 डिसेंबर 2020 ला प्राप्त अहवाल पाहून त्याला विभागीय आयुक्त अंतिम प्रभाग रचना मान्यता देतील. दि. 30 डिसेंबर 2020 ला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अधिनियमातील कलम 10 नुसार अंतिम अधिसूचना वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होईल.
तसेच जानेवारी ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 2 नगरपरिषद व 17 नगरपंचायतींसाठी प्रभागरचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केला आहे. यामध्ये दि. 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत दाखला प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी हे मान्यता देतील दि. 24 नोव्हेंबर 2020 ला सदस्य पदाचा आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिद्ध करणे हे सर्व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने होईल. दि. 27 नोव्हेंबर 2020 ला नगरपरिषद अथवा नगरपंचायतीच्या सदस्य पदाचा आरक्षणाची सोडत काढणे याच्यावर मुख्य अधिकारी हे कार्यवाही करतील. तसेच दि. 2 डिसेंबर 2020 पर्यंत प्रारुप प्रभागरचना प्रभाग दर्शक नकाशे व सदस्यपदाच्या आरक्षणाची रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागण्याकरता वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषद नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणे. दि. 2 ते दि.9 डिसेंबर 2020 पर्यंत हरकती व सूचना मागण्याचा कालावधी आहे. आलेल्या हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी यांच्यासमोर दि. 15 डिसेंबर 2020 ला सुनावणी होईल. यानंतर जिल्हाधिकारी हे आलेल्या हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय अभिप्राय देऊन संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठवणार असून यानंतर दि. 24 डिसेंबर 2020 ला संबंधित विभागीय आयुक्त हे अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देतील. शेवटी दि. 30 डिसेंबर 2020 पर्यंत अधिनियमातील कलम 10 नुसार अंतिम अधिसूचना वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषद नगरपंचायत तिच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होईल.

Post a Comment

0 Comments