Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लॉक केलेल्या कारमधून 24 लाख 97 हजाराची बॅग चोरी ; 24 तासाच्या आता चोरटे जेरबंद

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
परळी : मोंढा मार्केट येथे लॉक केलेल्या कारमधून 24 लाख 97 हजाराची बॅग चोरीस गेल्याच्या दाखल गुन्ह्यानंतर पोलिसांनी 24 तासाच्या आता चोरट्यांना जेरबंद केले आहे. याप्रकरणी परळी शहर पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरातून दोघे ताब्यात घेतले आहेत. आरोपींकडून एक कार आणि चोरीची रक्कम ताब्यात जप्त केली आहे.
परळी शहरातील मोंढा मार्केटमध्ये औरंगाबादहुन आलेल्या संजय गंगवाल यांच्या कारचे लॉक उघडून 24 लाख 97 हजार रुपयाची बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला होता. परळी शहरचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या डीबी पथकाने तपास सुरू केला. यात सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही धागेदोरे हाती लागले. यानंतर पोलिसाच्या एका पथकाने औरंगाबाद जवळील खराडी येथे जाऊन संशयित चोरट्याचा शोध घेतला. पण त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही.
यानंतर परळी पोलिसांनी वैजापूर गाठले. येथे दोन्ही संशयित आरोपी आढळून आले. चौकशी दरम्यान त्यांनी चोरी केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून बॅग जप्त केली असून यात 24 लाख 8 हजार रुपये सापडले आहेत. आरोपींना परळी शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. ही कारवाई बीड जिल्हा पोलिस अधीक्षक राजा स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक हेमंत कदम , डी बी पथकाचे जमादार भास्कर केंद्रे, सुंदर केंद्रे, गोविंद भताने, शंकर बुडे सुनील अनमवार यांनी केली. Post a Comment

0 Comments