Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकींचे 17 नोव्हेंबरला चिञ स्पष्ट होणार

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक 5 मतदारसंघात निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा चिञ दि.17 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. ही निवडणूक प्रक्रिया 5 मतदारसंघांसाठी सुरु झाली आहे. या निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघातून दाखल केलेल्या 53 उमेदवारांपैकी 8 उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे यांचा अर्ज बाद झाला आहे.
औरंगाबादच्या पदवीधर निवडणुकीसाठी 53 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. यापैकी 8 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तर उर्वरित 45 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. बाद झालेल्या अर्जांमध्ये पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांच्याही अर्जाचा समावेश आहे. तर बंडखोर रमेश पोकळे आणि ईश्वर मुंडे यांचे अर्ज वैध ठरले आहेत. या पदवीधर निवडणुकीसाठी येत्या 17 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी निवडणुकीत कोणाची लढत होणार आहे, हे चिञ स्पष्ट होईल.
नागपुरामधून 5 अपक्ष 
उमेदवारांचे अर्ज अपात्र 
नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहे. यात अपक्ष उमेदवार वंजारी यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरला आहे. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात आता फक्त 26 उमेदवार उरले आहेत. दरम्यान नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात थेट लढत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्याशिवाय अमरावती शिक्षक मतदारसंघात 28 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. यात 28 उमेदवारांचे 64 अर्ज वैध ठरले आहे. यात संगीता शेंडे-बोंडे यांचा एक अर्ज अवैध ठरला आहे. तर भाजपकडून नितीन धोंडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तर महाविकासआघाडीकडून शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे रिंगणात उतरले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून 30 तर शिक्षक मतदारसंघातून 17 जणांचे अर्ज बाद
पुणे पदवीधर मतदारसंघात 78 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या मतदारसंघातून 108 जणांनी पदवीधर मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज भरला होता. या अर्जाची छाननी केल्यानंतर आता 30 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तर पुणे शिक्षक मतदारसंघात 50 उमेदवाराचे उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यासाठी 67 जणांनी अर्ज भरला होता. यातील 17 जणांचे अर्ज बाद ठरले आहेत. यात पक्षीय आणि संघटनांचे 5 उमेदवार सोडले तर 45 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं म्हटलं जात आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम -

निवडणूक जाहीर : 5 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : 12 नोव्हेंबरड
अर्ज छाननी : 13 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस : 17 नोव्हेंबर
मतदानाचा दिनांक : 1 डिसेंबर मतदान (सकाळी 8 ते सांयकाळी 5 )
मतमोजणी : 3 डिसेंबर
निवडणूक प्रक्रिया संपण्याचा दिवस : 7 डिसेंबरPost a Comment

0 Comments