Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माळी खूनप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल ; पोलिसांनी घेतले पाचजण ताब्यात
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शिर्डी - आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथे परत गुन्हेगारी राज हळूहळू डोके वर काढू लागले असून काल रात्री येथील गुंडांनी निमगाव हद्दीतील देशमुख चारी जवळील राहणाऱ्या रवींद्र साहेबराव माळी यांच्या मानेवर चाकूने वार करून खून केला आहे. या घटनेमुळे शिर्डीत नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या खून प्रकरणी अकरा जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शिर्डी च्या शासकीय गेस्ट हाऊस समोरील देशमुख चारी येथे निमगाव हद्दीमध्ये रवींद्र साहेबराव माळी यांचे व आरोपी यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते व या भांडणाची तक्रार शिर्डी पोलीस स्टेशनला रवींद्र साहेबराव माळी यांनी केली होती. याचा राग धरून अजय वैजनाथ भांगे, विशाल रमेश पाटील, रविंद्र बनसोडे ,समीर शेख, राजू पठाण, रंजना वैजनाथ भांगे, ललिता रमेश पाटील ,सुनील लोखंडे, अक्षय शिंदे, महेश गायकवाड, कुणाल जगताप आदी 11 जणांनी 19 नोव्हेंबर च्या रात्री अकरा वाजे दरम्यान देशमुखचारी जवळ रवींद्र साहेबराव माळी ला तीन जणांनी पकडून बाकीच्यांनी त्यांच्या मानेवर चाकूने वार केले व जबर गंभीर करून त्यांचा खून केला आहे ,या मुळे शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे .ही घटना कळताच शिर्डीचे पोलिस उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तातडीने निर्णय घेत परिसरात आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यातील पाच आरोपी यांना अटक केली असून उर्वरितांचा शोध सुरू आहे. शिर्डी पोलीस स्टेशनला या संदर्भात भादवि कलम 302/ 120 ब 143/ 147/ 148/ 149 /504 /506 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे/ अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments