Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुगल सर्च इंजिन कंपनीद्वारे Google Verified Calls

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क / नगर रिपोर्टर 

  आजच्या काळात जवळपास सर्वच नागरिकांकडे स्मार्टफोन आहेत. या स्मार्टफोन्सवर अनेकदा असेही कॉल्स येतात ज्याबाबत आपल्याला काहीही माहिती नसते. अशा परिस्थितीत ट्रूकॉलर सारखे अॅप्स (TrueCaller App) तुम्हाला कोण कॉल करत आहेत याची माहिती देतं. आता गुगल (Google) कंपनीने सुद्धा असेच एक फिचर उपलब्ध केले आहे. ज्याच्या सहाय्याने आपल्याला कोण कॉल करत आहे हे सहज कळणार आहे. गुगलच्या या फिचरचं नाव आहे Google Verified Calls.

जाणून घेऊयात या फिचर बद्दल...
गुगल सर्च इंजिन कंपनीद्वारे Google Verified Calls या फिचरची घोषणा करण्यात आली आहे. गुगल कंपनीचं हे फिचर युजर्सला सांगणार आहे की, तुम्हाला कोण कॉल करत आहे आणि कॉल करण्यामागचं कारणही सांगणार आहे. इतेच नाही तर कॉलरचा लोगोही दर्शवणार आहे. हे नवं फिचर लॉन्च करण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे फोन कॉल्सच्या माध्यमातन होणारे घोटाळे, स्कॅमला आळा घालणे आहे. गुगल कंपनीच्या या फिचरची ट्रूकॉलर अॅपसोबत थेट स्पर्धा असणार आहे.

फ्रॉड कॉल्स रोखण्यात मदत 
भारतासोबतच जगभरात फ्रॉड कॉल्स ही एक मोठी समस्या आहे. गुगलचं Verified Calls फिचर हे युजर्सला या फ्रॉडपासून बचावण्यास मदत करणार आहे. हे फिचर फोनमध्ये येणाऱ्या कॉलबाबत माहिती देणार आहे. ज्यामध्ये कोण कॉल करत आहे, बिझनेस कॉल कशा संदर्भात तसेच का कॉल करत आहे. यासोबतच बिझनेसचं व्हेरिफाइड बॅचही गुगलतर्फे व्हेरिफाइड नंबरवर देण्यात येणार आहे. हे फिचर भारत, स्पेन, ब्राझील, मेक्सिको आणि अमेरिकेसह जगभरात रोलआऊट करण्यात येत आहे. 
सध्या ट्रूकॉलर सुद्धा अशाच प्रकारची सुविधा युजर्सला देत आहे. पण आता गुगल फोन अॅपमध्ये हे नवं फिचर आल्यावर ते युजर्सच्या स्मार्टफोनचा एक हिस्सा बनेल. म्हणजेच कुठलंही नवं अॅप तुम्हाला डाऊनलोड करण्याची आवश्यकता भासणार नाही आणि Google Verified Calls तुमचं ट्रूकॉलरचं काम करुन देईल. एका ब्लॉगमध्ये गुगलने लिहिलं आहे की, पायलट प्रोग्रामच्या सुरुवाती निकाल खूपच चांगले आहेत आणि युजर्सला याचा फायदा जरुर होईल.  गुगलच्या मते, स्पॅम आणि स्कॅम कॉल्समुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे गुगलचं फिचर हा एक प्रयत्न आहे की, फ्रॉड कॉल्सला आळा घालण्यात येईल. 
 

Post a Comment

0 Comments