Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अण्णा नगरकर यांचे निधनऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि.10 - नगर येथील रहिवासी रंगनाथ उर्फ अण्णा दत्तात्रय नगरकर ( नेप्तीकर) वय वर्ष 85 यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. शहरातील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट उमेश नगरकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पुतण्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
अण्णा नगरकर हे मूळचे नेप्ती येथील आहे, प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे .काल सायंकाळी च्या सुमाराला त्यांना अचानक पणे त्रास सुरू झाला त्यांना येथील खासगी रुग्णालयांमध्ये नेले असता तेथे त्यांचे निधन झाले.
अत्यंत मनमिळाऊ स्वभाव तसेच धार्मिक कार्याची आवड त्यांना होती सनातन धर्म सभेच्या माध्यमातून अनेक धार्मिक कार्यामध्ये त्यांनी सातत्याने सहभाग घेतला आहे तसेच शहरातील अनेक धार्मिक कार्यामध्ये ते अग्रेसर होते ,शेती व्यवसाय त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळला, प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments