Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजयुमोच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निळंकट चाटे यांची निवड

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
परळी वैजनाथ दि.३ - भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या बीड जिल्हाध्यक्ष निळंकट चाटे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री पंकजाताई मुंडे व बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते आज मुंबई येथे नियुक्ती पत्र देण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (दादा) पाटील,लोकनेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रीतमताई मुंडे व भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते निळकंट (भाऊ) चाटे यांची भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा बीड जिल्हाध्यक्षपदी आज दि.03 सप्टेंबर रोजी निवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रा.पवन मुंडे (सर), बाळासाहेब फड, आशिष कदरे इतर उपस्थित होते.  निवडीच्या पञात नमुद केले आहे कि,भविष्यात आपल्यावरती सोपवलेली जबाबदारी आपण चांगल्या प्रकारे पार पाडाल व बीड जिल्ह्यातील प्रत्येक मंडळात भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढवण्यासाठी आपण योगदान द्याल,तुमच्या प्रयत्नातून पक्षाच्या समर्थनार्थ युवाशक्ती खंबीरपणे उभा राहील असा आमचा विश्वास आहे अशी अपेक्षा बीड भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले आहे.
लोकनेते स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी घालुन दिलेल्या शिकवणीच्या प्रेरणेवर आयुष्याची वाटचाल सुरु असुन लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सक्षम समाज निर्मितीचे कार्य सुरु असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी व्यक्त केले.यानिवडीबद्दल त्यांनी आपल्या नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या कार्यामुळे लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या सामाजीक कार्याची व संघर्षाची ज्योत कायम असुन समाजातील रंजल्या-गांजल्या घटकांसाठी त्यांचे कार्य आम्हासाठी मार्गदर्शक आहे.लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आपल्या आयुष्यात ऊसतोड मजुर,दीन दुबळ्यासासाठी कसलीही तडजोड न करता संघर्ष केला राजकिय,सामाजीक क्षेत्रात कार्य करण्याची शिकवण ही माझ्यासाठी आयुष्याची शिदोरी असुन त्यांच्या या प्रेरणेने माझी वाटचाल सुरु असुन भविष्यात काम करताना स्व.मुंडे साहेबांची शिकवण ही हीच माझी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. युवानेते निळकंठ चाटे यांच्या या निवडीने युवा वर्गात प्रचंड आकर्षण निर्माण होणार असुन पुढील वाटचालीस शुभेच्छाचा वर्षाव व स्वागत होत आहे.

Post a Comment

0 Comments