Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संतप्त नागरिकांकडून कोरोना चाचणी केंद्रावर तोडफोड ; जमा केलेले स्वॅब नमुने फेकले !

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे : कोरोनाची चाचणी करण्यास आलेल्या नागरिकांंनी मोठा गोंधळ करत केंद्रातील जमा केलेले स्वॅब नमुने सुद्धा फेकून दिल्याची घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.
समजलेली माहिती अशी की, पुणे येथील भारती विद्यापीठनजिक असणा-या कोरोना चाचणी केंद्रावर बुधवारी (दि.१५)  चाचणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांंनी हल्लाबोल करत सेंटरमध्ये जमा केलेले स्वॅब नमुने सुद्धा फेकून दिल्याचे समजत आहे. झालं असं की, भारती विद्यापीठ समोर असलेल्या कोरोना चाचणी केंद्रात आपली टेस्ट करुन घेण्यासाठी बुधवारी सकाळपासून गर्दी केली होती. यामुळे अनेक जण रांंग लावून उभे होते. परंतु दुपारपर्यंत टेस्टिंंग किट संंपल्याने कोरोनाची तपासणी करण्यास आणखीन वेळ लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली. याबाबत केंद्रावरील कर्मचार्‍यांंनी नागरिकांंना माहिती देताच त्यांंचा पारा इतका चढला. नागरीक संतप्त झाल्याने
थेट तपासाणी केंद्रात घुसून तोडफोड करायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर अगोदरच्या चाचण्यांंमध्ये घेण्यात आलेले स्वॅबचे नमुने सुद्धा नागरिकांंनी फेकून दिले.
या सगळ्या प्रकारात धक्कादायक म्हणजे नागरिकांंनी तोडफोड करताना फेकलेल्या नमुन्यांंमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे देखील स्वॅब होते, दरम्यान या प्रकरणी आता पुणे महापालिकेकडून भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अशीच एक घटना पुण्यात आंबेगाव येथील लक्ष्मीबाई हजारे वस्तीगृह येथे सुद्धा झाला होता. याठिकाणी कोरोना चाचणी होत असताना अँटीजेन किट संपल्यामुळे आमची टेस्ट आधी करा, अशी मागणी करत नागरिक कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेले होते. यावेळी कर्मचार्‍यांना मारहाण करत घेतलेले स्वॅबही लाथा मारून खाली पाडून दिले होते.
दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांंनी दिलेल्या माहितीनुसार आज पुणे शहरात १,६९१ नवे कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत ज्यानुसार एकुण कोरोनाबाधितांंचा आकडा १,२२,४४८ इतका झाला आहे. आजवरच्या रिकव्हर झालेल्या रुग्णांंचा आकडा १,०२,०९५ इतका आहे तर एकूण बळींंचा आकडा २,८७५  इतका झाला आहे. पुणे शहरात सध्या कोरोनाचे १७,४७८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Post a Comment

0 Comments