Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केली ५ पोलिस कर्मचा-यांवर कारवाई

 


तिन पोलीस बडतर्फ आणि एकास सक्तीने सेवानिवृत्त व एक पोलिस खात्यातून कमी
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
कोल्हापूर :   कामात अनियमितता, बेशिस्तपणा, गैरवर्तनणासह नियमांचा उल्लंघन करणाऱ्या जिल्हा पोलिस दलातील पाच पोलिस कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली. पाचपैकी तिन पोलिस कर्मचा-यांना बडतर्फ केले आहे. एका महिला पोलिसला सक्तीने सेवानिवृत्ती व एकावर पोलिस खात्यातून कमी करण्याची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केली. या पाच पोलिस कर्मचा-यांवर झालेल्या कारवाईने जिल्हा पोलिस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. 


कारवाई झालेले पोलिस कर्मचारी याप्रमाणे पोलिस नाईक अमित दिलीप सुळगावकर, नारायण पांडुरंग गावडे, महादेव पांडुरंग रेपे या तिन पोलिसांना बडतर्फ आणि समीना दिलावर मुल्ला सक्तीने सेवानिवृत्त व पोलिस नाईक संतोष हरी पाटील यांना पोलिस खात्यातून काढून टाकण्यात आले आहे. 
जुना राजवाडा ठाण्यातून पोलिस नाईक सुळगावर या पोलिस कर्मचा-याची सध्या पोलिस मुख्यालयात नेमणूक होती. तर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात असताना त्यांच्याकडे एका महिलेने एक व्यक्ती त्रास देत असल्याचा तक्रार अर्ज दिला होता. त्यांनी तो अर्ज वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिला नाही. तो स्वःतजवळ ठेवत संबधित संशयिताबरोबर संपर्क केला, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. गांधीनगर पोलिस ठाण्यात तत्कालिन कर्तव्य बजावणारे पोलिस नाईक नारायण गावडे, महादेव रेपे या दोघांचे बेटींग बुकीशी लागेबंधे असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. त्यात ते दोषी आढळल्याने तिघांना बडतर्फ करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिले. 
दरम्यान, राजारामपुरी ठाण्यातील समिना मुल्ला यांची ८ डिसेंबर २०१७ मुख्यालयात बदली झाली. त्यांनी वैद्यकीय रजेवर असल्याचे कळविले; पण त्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही. मुख्यालयात त्या निवडणूक काळासह इतवेळीही हजर राहिल्या नाहीत. सांगली जिल्हा पोलिस दलात कार्यरत असणारे पोलिस नाईक संतोष पाटील सध्या कागल येथे नेमणुकीस होते. ते, सांगलीतून परवानगी न घेता जयसिंगपुरात आले. त्यांचे सहकाऱ्यांशी सलोख्याचे संबध नव्हते, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. विभागीय चौकशी अंती ते दोषी आढळले. त्यामुळे या दोघांवर सक्तीने सेवानिवृत्ती व खात्यातून कमी करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments