ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे, दि.६ - जिल्हा कारागृह कमिटी आहार व छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुमित दरंदले व शिवराज प्रतिष्ठान चे विनोद परांडे यांच्या नियोजनाखाली व छावाप्रमुख धनंजय जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोनाच्या काळात आपल्या महाराष्ट्र पोलीस (पुणे पोलीस) यांच्या करीता वाफ घेण्यासाठी स्टीमर मशिनचे वाटप येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे करण्यात आले.
पोलीस प्रशासनाच्या आरोग्याच्या काळजी च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे वाफेचे मशिन देण्यात आले. या वस्तूंचे वाटप कारागृह अतिरिक्त पोलीस अधीक्षक भोसले मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
त्याप्रसंगी प्रभारी उपअधिक्षक प्रदिप जगताप, सिनीयर जेलर नितीन क्षिरसागर, ज्ञानेश्वर खरात उपस्थित होते.
0 Comments