Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कपशीत गांजाचे घेतले आंतरपिक ; पोलिसांनी केले तिघांना अटक

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
हिंगोली : जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील उमरा या ठिकाणी येथील शेतामध्ये आंतरपिक म्हणून चक्क कापूस पिकामध्ये गांजाची शेती केल्याप्रकरणी  पोलिसांनी शनिवारी (दि.१२) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून शेतीची पाहाणी केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, औंढा तालुक्यातील उमरा या ठिकाणी कायद्याने गांजा शेती करणे गुन्हा आहे. असे असतानाही कापूस पिकामध्ये गांजा पिकवला जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे व त्यांच्या पथकाने शनिवारी (दि.१२) सकाळी उमरा या गावाच्या परिसरात छापा टाकला. या दरम्यान, कापूस पिकामध्ये आंतरपिक म्हणून गांजाची शेती केली असल्याचे पोलिसांच्या पाहाणीत समोर आले. यानंतर पोलिसांनी परिसरातील अन्य शेतांमध्ये जाऊन कुठे गांजा शेती करत आहे का ? याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून खाञी केली.
यावेळी पोलिसांनी संबंधित शेती मालिकासह दोघांना अधिक तपासासाठी ताब्यात घेतले.


Post a Comment

0 Comments