Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

परळीत लाखो रुपयांचा गुटखा जप्त ;१६ बॅग व जीप पोलीसांनी घेतलं ताब्यात

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
परळी वैजनाथ, दि.४- संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी (दि.3) रात्री पोलीसांनी जीपमधून वाहतूक केला जाणारा लाखो रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला. परळीत सातत्याने गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पोलीसांनी जीप ताब्यात घेतली असून पुढील कार्यवाही सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुरुवारी रात्री संभाजीनगर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चाँद मेंढके व कर्मचार्‍यांनी शहरात एक संशयित जीप शहरातील गंगाखेड रोडवर थांबवून तपासणी केली. या जीपमध्ये गुटखा भरलेल्या 16 बॅग आढळून आल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीसांनी गाडी जप्त केली असून पुढील कार्यवाही सुरु असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक चाँद मेंढके यांनी दिली. दरम्यान परळीतूनच बीड जिल्ह्यात गुटख्याचा काळा धंदा तेजीत केला जात असल्याचे स्पष्ट होवू लागले आहे.

Post a Comment

0 Comments