Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आयएएस दाम्पत्याच्या १०० कोटींच्या बेनामी संपत्तीवर जप्ती

 


नोकर व नोकराच्या नातेवाईकांच्या 
नावे संपत्ती असल्याचे उघड
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नवीदिल्ली - भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले आयएएस दाम्पत्य अरविंद जोशी व टीनू जोशी या दोघांची १०० कोटींच्या बेनामी संपत्तीवर जप्ती येणार आहे. आयकर विभागाने कारवाईला सुरुवात केली असून, लवकरच १०० कोटी किंमत असणाऱ्या १०० मालमत्ता आयकर विभाग ताब्यात घेणार आहे. 
२०१० साली फेब्रुवारी महिन्यामध्ये आयकर विभागाने जोशी यांच्या भोपाळमधील घरी छापा मारला होता. तेथे त्यांना तीन कोटी रुपये आणि बेकायदेशीर संपत्तीसंदर्भातील महत्वाची कागपत्रं हाती लागली होती. तेव्हा पासून या प्रकरणाचा तपास सुरु असून जोशी दाम्पत्याने वेगवेगळ्या जागी खरेदी केलेल्या बेकायदेशीर संपत्तीचा आकडा पाहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. आयक विभागाच्या दिल्लीतील एज्युकेटिंग अथॉरिटी विंगने या संपत्तीचे मुल्यमापन केलं असून १०० कोटींची संपत्ती जोशी दाम्पत्याने जमवल्याचा दाव्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणासंदर्भातील अनेक याचिका रद्द करण्यात आल्यानंतर नोटीस जारी करुन जोशी दाम्पत्याकडून या संपत्तीसंदर्भात उत्तर मागवण्यात आलं होता. मात्र त्यांना या संपत्तीचा योग्य तपशील न्यायालयासमोर सादर करता आला नाही. त्यामुळेच आता कायदेशीर लढाईनंतर ही संपत्ती कायदेशीर पद्धतीने कमवलेली नाही असा ठपका ठेऊन आयकर विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे.

अरविंद आणि टीनू जोशी यांच्या संपत्तीमध्ये फेथ ग्रुपचे मालिक राघवेंद्र सिंह तोमर यांची हिस्सेदारी असल्याची माहितीही चौकशीमध्ये समोर आली आहे. दिल्लीतील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी फेथ बिल्डर आणि गोल्डन बिल्डरविरोधात कारवाई केली होती. त्यानंतर फेथ ग्रुपच्या मालकीच्या १० ते १५ एकर जमीनीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेथ ग्रुपच्या मलकीची सांगण्यात येणारी ही जमीन अरविंद जोशीचे वडील एच. एम. जोशी आणि आई निर्माला जोशी यांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच फेथ क्रिकेट अकॅडमीची १० एकर जमीनही या बेकायदेशीर संपत्तीच्या यादीमध्ये असल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे. या जमीनीची किंमत १० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात अकॅडमीला नोटीस पाठवून व्यवहारासंदर्भातील माहिती मागवली जाईल. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास ही जमीनही ताब्यात घेतली जाईल.

संपत्तीची ठिकाणी...
१०० वेगवेगळ्या संपत्तीमध्ये प्रमुख्याने २२० एकर शेतजमीन, फ्लॅट, घरांबरोबरच वेगवेगळ्या ठिकाण घेतलेल्या जमीनीच्या तुकड्यांचा समावेश आहे. या संपत्तीची एकूण किंमत १०० कोटी रुपये आहे. एका कंपनीमधील ४० वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती असून त्यापैकी १० आई-वडिलांच्या नावे, नोकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे १० ठिकाणी संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. या संपत्तीमधील जमीनींचा व्यवहार रायसेन, सीहोर आणि मंडला येथील आहे. मंडला येथील कान्हा राष्ट्रीय उद्यानामध्ये रिसॉर्ट बनवल्यासंदर्भातील माहितीही समोर आली आहे. चार कोटींची विमा पॉलिसी या दोघांच्या नावे आहे. अरविंद आणि टीनू यांनी उच्च न्यायालयात सहा वेळा याचिका दाखल केल्यात मात्र प्रत्येक वेळेस कोर्टाने त्या रद्द केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments