Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पनवेल येथे पकडलेला रेशनिंगचा तांदूळ बार्शी तालुक्यातील नाही ; त्या कथित तांदूळ घोटाळ्याशी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा संबंध नाही

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बार्शी, दि.९ - बार्शी तालुक्यात रेशनिंगच्या तांंदूळ घोटाळ्या प्रकरणी बरीच चर्चा गाजली होती त्यात बार्शीच्या काही व्यापा-यांना तपासणीसाठी ताब्यातही घतले होते. परंतु पनवेल शहर पोलीस तसेच नवी मुंबई कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार या तांदूळ घोटाळ्याच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला तांदूळ हा भारतीय खाद्य निगमच्या  ओएमएसएस मधील लिलावाद्वारे घेतला, असून तो निर्यातीवर बंदी असताना ही विविध आफ्रिकन देशात निर्यात केला आहे. या गुन्ह्यातील आरोपीने हा तांदूळ बार्शी जिल्हा सोलापूर येथील धन लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी कडून खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या होत्या. मात्र पनवेल पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यात येऊन तपास केला, असता अशा प्रकारची कोणतीही कंपनी या ठिकाणी आढळून आली नाही. या सादर केलेल्या पावत्या बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. हा तांदूळ कर्नाटक राज्यातील  इंडी, विजापूर, तसेच हल्लुर तालुका मुदलगी जिल्हा बेळगाव इत्यादी ठिकाणावरून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील निर्यातीसाठी आणला असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
जप्त केलेल्या मालावर हरियाणाचे  शिक्के असून पोलिसांनी टेक केअर लॉजिस्टिक पळसे येथील पलक रेशन गोडाऊन पनवेल  येथून त्यावेळी ११० मेट्रिक टन तांदूळ जप्त केला  जवळपास ३३ लाखाचा  मुद्देमाल  त्यावर एशियन राईस लोगो असलेल्या ६५२ पिवळ्या रंगाच्या व पांढऱ्या रंगाच्या २९५  गोण्या त्याचप्रमाणे उर्वरित १२७३ गोण्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया , गव्हर्मेंट ऑफ पंजाब व हरियाणाचा शिक्का आसलेल्याआढळून आल्या  त्यामुळे हा माल सोलापुरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी आलेला नाही. संचारबंदीच्या काळात सोलापूर जिल्ह्यात वाटप केलेल्या मालाचे रेकॉर्ड ही तपासणी केली असता ते व्यवस्थित असल्याचे दिसून आले व वितरण विभागाच्या वतीने ही सांगण्यात आले.
    सदर आरोपींनी स्थापन केलेल्या कंपनीमार्फत १ जानेवारी २०२० पासून आजपर्यंत ३२ हजार ८२७ मेट्रिक टन तांदूळ हा परदेशात निर्यात केल्याचे तपासणीत दिसून आले आहे. यासाठी नवी मुंबई पनवेल शहर पोलीस यांनी विशेष पथके नेमली आहेत या पथकाने आतापर्यंत कर्नाटक राज्यात जाऊन तेथील रेशन दुकानदार यांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात आजपर्यंत १८ आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे यामध्ये नवनाथ राठोड (वय २५, रा. इंडि), सत्तार सय्यद (वय २५, रा. इंडि ता. विजापूर) , कृष्णा पवार (वय ४५,रा. हिरेबेंदूर तांडा ता. इंडि ), यांना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकामार्फत पुढील तपास सुरू आहे. राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ही या प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. विशेष तपास पथकाला तपास जलद गतीने पूर्ण करून गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments