Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बेकायदेशीर टॅंगो पंच दारूची वाहतूक करणारा पिकप पकडला ; ४ लाख १७ हजार रूपयांचा माल जप्त

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बार्शी दि.६- नारी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून टॅंगो पंच दारूचे ४२ बॉक्स घेऊन कुर्डूवाडी कडे  बेकायदेशीर वाहतूक करणारा पिकप खांडवी जवळ बार्शी येथील ग्रामीण पोलिसांनी पकडून दारूसह चार लाख १७ हजार ३१२ रुपय किमतीचा माल केला जप्‍त केला.
   याबाबत समजलेली माहिती अशी की, बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि. श्री जायपत्रे यांना गोपनीय बातमी दाराकडून समजले की शेंद्री कडून बार्शी रोडणे खांडवीकडे एक एक पिकप टॅंगो पंच चे बॉक्स घेऊन येत आहे. त्यानुसार पोलिसांनी खांडवी येथे न्यू डायमंड हॉटेलसमोर असलेल्या स्पीड बेकरजवळ सदरचे वाहन थांबवले व चालकास ताब्यात घेतले. तपासणी केली असता, त्यामध्ये पुढील बाजूस टॅंगो पंच दारुचे बॉक्स ठेवलेले दिसत होते तर मागील बाजूस रिकाम्या प्लास्टिक कॅरेट लावण्यात आले होते. चालकास नाव गाव विचारले असता मोहसीन मोहम्मद सय्यद वय ३६ वर्षे राहणार नारी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर असे सांगितले व सदरचे बॉक्स हे नारी येथून सागर बाळासाहेब बारंगुळे यांनी माझ्या गाडीत भरून दिले आहेत. मला हे बॉक्स कुर्डूवाडी कडे घेऊन ये मी पुढे थांबलो आहे, असे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी बॉक्स घेऊन कुर्डूवाडी बार्शी रोडवरील एस आर पेट्रोल पंपाजवळ वांगरवाडी तालुका बार्शी शिवारात येऊन थांबलो. खूप वेळ  वाट पाहिली परंतु बारंगळे हे तिथे आलेच नाहीत. शेवटी मी त्यांना फोन लावला परंतु त्यांचा फोनही लागला नाही. त्यामुळे मी परत सदर चा पिकप घेऊन परत नारीला चाललो आहे, असे पिकप ड्रायव्हर मोहसीन मोहम्मद सय्यद यांनी सांगितले. पिकप मधील टॅंगो पंच कंपनीच्या १८० मिली च्या एका बॉक्समध्ये ४८ बाटल्या असलेले ४२ बॉक्स आणि वाहन असा एकूण चार लाख १७ हजार ३१२ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
 दारूबंदी अधिनियम ६५ ई ६५ क ६५ ड आणि ८३ नुसार बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास करण्यात येत आहे. सदरच्या दारूच्या बाटल्या वरील असलेला बॅच नंबर वरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने त्याची तपासणी करून सदर दारू ही कोणत्या दुकानातील आहे किंवा ही दारू नारी मध्येच तयार केली आहे की काय हे पुुुढील तपासात समजेल.


Post a Comment

0 Comments