Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेचा सोन्या-चांदीच्या भावावर परिणाम

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबईसोन्याच्या भावात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रतिग्रॅम ५१ हजार रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७ हजार २०० रुपये झाला आहे. गेल्या आठवड्यात हाच दर जीएसटी सह ५५ हजार रुपयांवर होता.
जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेचा सोन्या-चांदीच्या भावावर परिणाम झाला आहे. 
आर्थिक अनिश्चिततेच्या वेळी सोन्याला एक सुरक्षित गुंतवणूक मानले जाते; पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अनेक आर्थिक घडामोडींचा सोने भावावर परिणाम होतो.
गेल्या सहा दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. बुधवारी दि.२ सप्टेंबर रोजी देशभरातील सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ५५१ रुपयांनी घसरून ५१,०२४ रुपयांवर आला आहे. नंतर पुन्हा या भावात वाढ होऊन सोन्याचा भाव ३२९ रुपयांनी वाढून ५१,५७५ रुपयांवर बंद झाला होता. त्याचबरोबर चांदीचा दर २०४६ रुपयांनी घसरून ६६,३५६ रुपयांवर आला. अमेरिकी डॉलर इंडेक्समध्ये घसरण आणि दहा वर्षांच्या अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात घट झाल्याचे दिसून आले.
गेल्या महिन्यात २६ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ५१ हजार ४०० रुपये होता. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ५० हजार ५०० रुपये गेला होता.


Post a Comment

0 Comments