Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अनैतिक संबंधास बाळच करतय अडचण ; त्याचं काम करून टाक ! प्रियकर सारखच म्हणायचा , म्हणून मीच केला पोटच्यागोळ्याचा खून. आईने केले कबुल...

  


मयत सार्थक, त्याची आई अश्विनी तुपे
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
  बार्शी,दि.३- तालुक्यातील वांगरवाडी येथील सार्थक स्वानंद तुपे या अवघ्या नऊ महिन्याच्या बालकाचा खून त्याच्या जन्मदात्या आईने मोबाईल चार्जर च्या वायरने त्याचा गळा आवळून खून केला होता परंतु अज्ञात चोरांनी घरात घुसून तिच्या तोंडात कापडी गोळा घालून हात-पाय बांधून तिच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र चोरून नेले व ९  महिन्याच्या चिमुकल्याचा मोबाईल चार्जर च्या वायरने  गळा आवळून खून केला अशी तक्रार मयत सार्थक स्वानंद चे चुलते आनंद राजेंद्र तुपे यांनी बार्शी तालुका पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी तपास यंत्रणा सुरू केली होती. यादरम्यान कसून चौकशी केली असता   मयत बालक हे सतत रडत होते त्याच्या या त्रासाला कंटाळून मी त्याचा मोबाईल चार्जर च्या वायरमेन गळा आवळून खून केला असे मुलाची आई अश्विनी तुपे हिने सांगितले होते व गुन्हा ही  कबूल केला होता परंतु पोलिसांचे या तिच्या सांगण्यावर विश्वास बसत नव्हता त्याचे काहीतरी वेगळेच कारण असल्याची शंका पोलिसांना सतत येत होती.

प्रियकर कुबेर उर्फ शशिकांत ठोंगे

 त्यानुसार पोलिसांनी भा द वि गुन्हा कलम ३०३ , ३९४ , ४५२ , नुसार गुन्हा दाखल करून तिला ७ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती त्यावेळी कसून चौकशी केली असता गोपनीय खबऱ्याकडून  उपविभागीय अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे व सपोनि शिवाजी जायपत्रे यांना अश्विनी तुपे हिचे तिच्या घराशेजारी रहात  असलेल्या कुबेर उर्फ शशिकांत ठोंगे यांच्यासोबत बऱ्याच दिवसापासून अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली त्यानुसार चौकशी केली असता शशिकांत ठोंगे  यांनी  ही कबुली दिली अश्विनी चे सासू-सासरे शेतात कामास जातात तिचा नवरा ड्रायव्हर असल्याने तोही सतत बाहेरच असतो  दीर ही कामास जातो अश्विनी तुपे ही  घरी एकटीच असते  त्यांच्या अनैतिक संबंधास   लहान बाळ सार्थक हेच अडचण करीत होते त्यांना एकांत भेटत नव्हता त्यामुळे
    अश्विनी तुपे चा प्रियकर कुबेर उर्फ शशिकांत ठेंगे हा अश्विनीस सतत म्हणायचा आपल्या अनैतिक संबंधास हे बाळच अडचण करतय त्याचं काम करून टाक सारखच म्हणायचा म्हणून मीच त्याच्या सांगण्यावरून माझ्या पोटच्या गोळ्याचा खून केला असल्याचे स्वतः  जन्मदात्या आईने केले कबूल......
    त्यानुसार या प्रकरणातील दुसरा आरोपी अश्विनीचा प्रियकर कुबेर उर्फ शशिकांत ठोंगे वय  ३६ वर्ष राहणार वांगरवाडी तालुका बार्शी यास पोलिसांनी दिनांक २८ ऑगस्ट रोजी अटक करून कोर्टासमोर हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


 , 

Post a Comment

0 Comments