Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डीनजिकच्या टोलनाक्यावर ट्रक आडवून खूनासहित दरोडा टाकणारे सराईत गुन्हेगार २४ तासात जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखा व लोणी पोलिसांची कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि.८- शिर्डी
नजिक निर्मळपिंप्री शिवारातील टोलनाक्यावर ट्रक आडवून खूनासहित दरोड्याचा दाखल राहाता तालुक्यातील लोणी पोलिस ठाण्यातील गुन्ह्याचा तपास लोणी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने २४ तासात तपास लावून आरोपींना जेरबंद करण्याची कारवाई केली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी पञकार परिषदेत दिली. 
यावेळी अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार आदि उपस्थित होते.
समजलेली माहिती अशी की, लोणी पोलिस ठाण्यात भुपेद्रसिंह बहादुरसिंह ठाकूर (रा.रामाहेगव, ता.धर्मपुरी, जि.धारा, मध्यप्रदेश) या ट्रकचालकाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. फिर्यादी ठाकूर यांच्याकडे चौकशी करून घटनास्थळाची पाहाणी केली. यावेळी अंगुलीमुद्रा तज्ञ, डाॅग स्काॅड आणि फाॅरेन्सीक व्हनच्या मदतीने बारकाइने पाहाणी केली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी संबंधीत पोलिस अधिका-यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने सूचना दिल्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक दोन पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथके तयार करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार लोणी पोलिस ठाण्याचे पोसई सुर्यवंशी, पोहेकाॅ औटी, पोना रोकडे, कुसळकर यांनी आरोपी किरण राजु राशीनकर (वय २४, रा.भगवतीपूर,कोल्हार) याला ताब्यात घेतले. घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता, सहभागी आरोपीची नावे सांगितले. सोहेल नशीर शेख (वय १९ रा.पिंजारगल्ली, कोल्हार), संतोष सुरेश पठारे (वय २४, चर्चजवळ,कोल्हार), विशाल कचरू लोंखडे (वय १९, रा.कोल्हार हौ.सो.), अक्षय राजेंद्र शिंदे (वय १९, राऊतवस्ती, कोल्हार), संकेत किरण लोंखडे (वय १८, रा.भारत पेट्रोलपंपजवळ, कोल्हार), रूपेश ज्ञानदेव चव्हाण (वय १८,रा.सुरेंद्र खेर्डे वस्तीवर, कोल्हार), सागर सोमनाथ देशमाने (वय ३२, रा.अंबिकानगर, कोल्हार) या सर्वांना कोल्हार परिसरात मोठ्या शिताफीने पकडले. गुन्ह्यात आरोपी आणखी एका फरारीचा शोध सुरु आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, दि.११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक सिंह यांनी सांगितले.
या कारवाईत लोणी पोलिस ठाण्याचे सपोनि प्रकाश पाटील, पोसई नाना सुर्यवंशी, पोहेकाॅ अशोक शिंदे, राजेंद्र औटी, पोना दीपक रोकडे, संभाजी कुसळकर, पोकाॅ सोमनाथ वडणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार, सपोनि शिशीरकुमार देशमुख, पोसई गणेश इंगळे, पोहेकाॅ हिंगडे, मनोहर गोसावी, विजय वेठेकर, पोना सुनिल चव्हाण, शंकर चौधरी, अण्णा पवार, विशाल दळवी, राम माळी, संतोष लोढे, दीपक शिंदे, पोकाॅ मच्छिंद्र बर्डे, योगेश सातपुते, रविंद्र घुगासे, संदिप दरदंले, प्रकाश वाघ, रणजित जाधव, जालिंदर माने, चापोहेकाँ कोतकर, चापोना धुळे आदिंच्या पथकाने परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments