Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जेऊरला बुधवारी दुपारी जोरदार पाऊस गावातील नदीला पूर

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर      
अहमदनगर दि.१०-   नगर  तालुक्यातील जेऊरला काल दुपारी दोन च्या सुमारास धुवाधार पावसाने कहर केला तासाभरात छोटे छोटे बंधारे भरले तर गावातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आला होता.       बुधवारी दुपारी शेंडी पासून पांढरी पुला पर्यंत मेघगर्जनेसह पावसास सुरुवात झाली तेव्हा मात्र शेंडी पासून नगर पर्यंत मात्र पावसाचा थेंबही पडत नव्हता आभाळात मात्र विजेचा कडकडाट चालू होता.
 जेऊर परिसरातील वाड्या वस्त्या डोंगर रांगेत मात्र तुफान पाऊस कोसळत होता तासाभरात जेऊर गावातील नदीला पूर आला बाजार तळ्यात पाणी शिरले नदीकाठी असलेल्या घरात पाणी आले होते, पण वेळीच पावसाने उघडीप दिल्याने पाणी ओसरले . या पावसामुळे काही ठिकाणी बाजरी पिके धोक्यात आली तर भुईमूग मका जनावरांचा चारा आदी पिकांत पाणी साचले खरीप पिकांची दाणादाण झाली या पावसाने विहिरींना मोठया प्रमाणात पाणी आले                                   

 

 बुधवारी दुपारी जेऊर परिसरात झालेल्या चांगल्या पावसाने गावातील सीना नदीला पूर आला होता. (छायाचित्र विजय मते)

Post a Comment

0 Comments