Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षकांच्या मागण्यांबाबत आ. सुधीर तांबेंना कॉंग्रेस महासंघ, कास्ट्राईब संघटनेच्या वतीने निवेदन; शहराध्यक्ष प्रसाद शिंदे यांचा पुढाकार

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि.९- : शासनाने दिलेल्या आश्‍वासनांची पुर्तता करुन शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावत त्यांना न्याय देण्याची मागणी शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर, प्राध्यापकेतर कर्मचारी काँग्रेस महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने शहराध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी कॉंग्रेसचे आ. सुधीर तांबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस महासंघाच्या वतीने शिष्टमंडळाने नुकतीच आ. तांबे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध मागण्याबाबत चर्चा केली. यावेळी आ. लहू कानडे यांची देखील उपस्थिती होती. या प्रसंगी प्रसाद शिंदे, राहुल मोरे, मार्टीन पारधे, अतुल सारसर, रविंद्र आगलावे, सिराज खान, ललित वाकचौरे आदी शिक्षक उपस्थित होते.
मागील महिन्यात शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांच्या नगर भेटीच्या वेळी देखील या मागण्यांकडे कॉंग्रेस महासंघाच्या वतीने लक्ष वेधण्यात आले होते.
राज्यातील २० टक्के अनुदान प्राप्त शाळांना घोषित, अघोषित खाजगी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करावे, पात्र घोषित शाळांना निधीची तरतूद करावी व २० टक्के अनुदानित शाळांना प्रचलित प्रमाणे वाढीव अनुदान मिळावे, जिल्हा प्रशासन व शिक्षक यांच्यामध्ये समन्वयासाठी समिती नेमावी, जुनी पेन्शन योजना लागु करावी, निवृत्त शिक्षकांना पेन्शन अदा करावी आदी मागण्या आ. तांबे यांना दिलेल्या निवेदानात करण्यात आल्या आहेत.
तसेच आत्महत्या केलेल्या शिक्षकांच्या कुटूंबाला आर्थिक मदत द्यावी, शिक्षकांचा कोरोना विमा काढावा, शिक्षण सेवकांचे मानधन वाढवावे, संच मान्यता पोर्टल सुरु करावे, घोषित २०  टक्के अनुदानीत शाळांचा निधि वितरीत करण्या बाबत देखील मागणी करण्यात आल्याचे महासंघाचे शिंदे यांनी सांगितले आहे.  
शहर जिल्हाध्यक्ष काळे घेणार पुढाकार 

यावेळी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण  काळे यांना शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लक्ष घालावे असे साकडे शिष्टमंडळाच्या वतीने घालण्यात आले. काळे यांनी यावेळी शिष्टमंडळाला आश्वस्त केले की शिक्षणमंत्री या कॉंग्रेस पक्षाच्या आहेत. मी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीतदादा तांबे, आ. सुधीर तांबे यांच्या माध्यमातून मंत्रालयस्तरावर यासाठी पाठपुरावा करेल.
शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन कॉंग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे आ. सुधीर तांबे यांना देताना शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर, प्राध्यापकेतर कर्मचारी काँग्रेस महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष प्रसाद शिंदे, राहुल मोरे, मार्टीन पारधे, अतुल सारसर, रविंद्र आगलावे, सिराज खान, ललित वाकचौरे आदी.Post a Comment

0 Comments