Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारी थोर पुरुष : काकासाहेब डोईफोडे

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी,दि.७ - आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारी थोर पुरुष होऊन गेले, त्यांचा इतिहास, त्यांचे कार्य देशासाठी मोठे महान अाहे, त्यांचे कार्याचा इतिहास पाठ्य पुस्तकातही देण्यात आला आहे ,असे मत शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी व्यक्त केले,
शिर्डी नगरपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 229 वी शासकीय जयंती साजरी करण्यात आली ,
यावेळी शिर्डी नगरपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, नितीन उत्तमराव कोते, नगरसेवक रवी गोंदकर, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, पत्रकार जितेश मनोहरलाल लोकंचंदानी, पत्रकार राजेंद्र विठ्ठल गडकरी,न,पं,चे मुख्य लिपिक मुरलीधर देसले, वाचनालय प्रमुख कोते मॅडम व नगरपंचायत अधिकारी कर्मचारीआशोक ढवळे यांनी पुष्पहार पुष्पगुच्छ तसेच पूजन करून जयंती साजरी केली, यावेळी काकासाहेब डोईफोडे म्हणाले की, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक हे एक स्वातंत्र्यसंग्रामातील आद्य क्रांतिकारक आहेत, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्व शिर्डी शहराच्या वतीने अभिवादन करत आहे, यावेळी नगरसेवक रवी गोंदकर यांनीही आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक हे इंग्रजांविरुद्ध लढणारे पहिले क्रांतिकारक होते ,त्यांनी आपल्या सवंगड्यांना बरोबर घेऊन इंग्रजांविरुद्ध पहिले बंड केले, त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करत असल्याचे ते म्हणाले, तसेच यावेळी येथील पत्रकार राजेंद्र गडकरी यांनी सांगितले की, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांनी सर्वप्रथम इंग्रजांविरुद्ध लढा उभारला व सलग 14 वर्षे इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते, त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केले व त्यांना फाशीची शिक्षा दिली, देश स्वातंत्र्यासाठी प्रथम फासावर जाणारे ते पहिले आद्यक्रांतिकारक ठरले गेले, यांचे राष्ट्रीय स्मारक खडकमाळ पुणे येथे असून जन्मस्थळ भिवंडी तालुका पुरंदर येथे ही शासकीय स्मारक आहे, जेजुरी गडावर त्यांचा पूर्ण कृती भव्य दिव्य पुतळा असून तेथे जयंती निमित्त कार्यक्रम होत आहेत, त्यांची जयंती आज सात सप्टेंबर रोजी शासकीय स्तरावर सर्व देशभर व महाराष्ट्रात साजरी होत आहे, शिर्डी नगरपंचायत मध्येही ती साजरी होताना आनंद होत आहे, त्यांचा कार्याचा येथे आज सर्वसामान्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने यापुढे अधिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले , यावेळी शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नितीन कोते ,रवी गोंदकर ,मुख्य लिपिक मुरलीधर देसले ,नरोडे, जावळे तसेच नगरपंचायतचे कर्मचारी अशोकराव ढवळे, त्याचप्रमाणे पत्रकार जितेश मनोरलाल लोकचदानी, पत्रकार राजेंद्र विठ्ठल गडकरी, सुजित अशोक ढवळे, आकाश ढवळे, राहुल अशोक मदने, राजेंद्र विश्वनाथ मदने ,निर्मला राजेंद्र मदने, डॉक्टर भोईटे, शरद विठ्ठल गडकरी ,भोईटे काका, रवींद्र गडकरी, आदींसह नगरपंचायत चे कर्मचारी, अधिकारी तसेच क्रांतिकारी रामोशी समाजाचे शिर्डी व परिसरातील कार्यकर्ते हे उपस्थित होते, कोरोनामुळे हा कार्यक्रम साध्या पद्धतीने व शासनाच्या अटी व शर्ती ठेवून, सोशल डिस्टंन्स पाळत व मास्क लावून हा कार्यक्रम शिर्डी नगरपंचायत मध्ये साधेपणाने पण उत्साहात साजरा करण्यात आला,

Post a Comment

0 Comments