Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गेवराई तालुक्यात विहिरीत आढळून आले अल्पवयीन मृतदेह

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बीड : जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीत माटेगाव शिवारात भाट आंतरवली या ठिकाणी विहीरीमध्ये मंगळवार दि.१ सप्टेंबरला दोन अल्पवयीन मृतदेह पाण्यात आढळून आले. मागील दोन दिवसांपासून हे दोघे बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. तर या दोघांमध्ये मावस बहीण भावाचे नाते आहे.
मयत शुभम कापसे (वय १७,रा.भाट आंतरवली) व कावेरी खंदारे (वय १६, रा. पाथरवाला खुर्द ता. गेवराई) ही दोघे सद्या माटेगाव येथे नातेवाईकांकडे राहत होते. कावेरीला विवाहासाठी पाहुणे पाहण्यास येणार होते. तेव्हा पासून ती अस्वस्थ होती. दरम्यान शनिवार (ता.२९) ऑगस्ट रोजी पासून ते दोघेही घरातून बेपत्ता होते. मृतदेह मंगळवारी विहिरीत पहाताच सुधाकर चव्हाण यांनी चकलांबा पोलिस ठाण्यात सदरील घटनेची माहिती दिली. 
माहिती कळताच चकलांबा ठाण्याचे स.पो.नि. मारोती मुंडे व पो.कॉ. अमोल औसरमल यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थाच्या साह्याने मृतदेह विहीरीबाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेहाचे उमापूर आरोग्य उपकेंद्रात शवविच्छेदन करून सदर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहेत. दोघांचे मृतदेह एकाच विहिरीत आढळून आल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.Post a Comment

0 Comments