Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उद्योग आधार ऐवजी आता उद्यम नोंदणी आवश्यक

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
   अहमदनगर, दि.११ - सूक्ष्‍म, लघु व मध्‍यम उद्योगांसाठी उद्योग आधाराच्‍याऐवजी नव्‍याने उद्यम नोंदणी करावी लागणार आहे. दि.१ जूलैपासुन ही नोंदणी सुरू झाली असून, त्‍याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२१ आहे. या काळात प्रत्‍येक सूक्ष्‍म, लघु, मध्‍यम तथा मोठ्या उद्योगांना या अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे.  दि.१ एप्रिल २०२१ रोजी सर्व उद्योग आधार रद्द होणार आहेत, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांनी दिली आहे.
  एमएसएमई मंत्रालयाने उद्योगांचे वर्गीकरण आणि नोंदणीसाठी मार्गदर्शक तत्‍वे प्रसिध्‍द केली असून, त्‍याची अंमलबजावणी दि.१ जुलैपासून सुरू करण्‍यात आली आहे. आता उद्यमांची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. जीएसटी क्रमांक, आधार नंबर आणि पॅन कार्ड असेल तर उद्यमची नोंदणी घरबसल्‍या करता येणार आहे. त्‍यासाठी कुठलेही शुल्‍क आकारण्‍यात येणार नाही. एका जीएसटी क्रमांकावर एकाच उद्यमांची नोंदणी करता येणार आहे. खोटी माहिती भरली जाऊ नये यासाठी उद्यम नोंदणी प्रक्रिया पूर्णतः आयकर आणि जीएसटी प्रणालीशी जोडण्‍यात आली आहे. हा पूर्णपणे पेपरलेस उपक्रम आहे. जिल्‍हा पातळीवर उद्योजकांना ही सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याची जबाबदारी जिल्‍हा उद्योग केंद्राकडे सोपविण्‍यात आली आहे. चॅ‍म्पियन्‍स प्रणालीद्वारे उद्योजकांना नोंदणी आणि त्‍यानंतरच्‍याही सुविधा पुरविल्‍या जाणार आहेत.
 अहमदनगर जिल्‍ह्यामध्‍ये प्राप्‍त अभिलेख्‍यानुसार एकूण ४० हजार ८१३ घटकांनी उद्योग आधार नोंदणी घेतलेली आहे. यापूर्वी उद्योग आधार नोंदणी करतांना भरलेल्‍या माहितीची प्रत्‍यक्ष पडताळणी करणारी यंत्रणा नव्‍हती. मात्र, आता प्‍लान्‍ट अॅण्‍ड मशिनरीची माहिती देतांना त्‍याबरोबर मागील वर्षाचे आयकर विवरणपत्र जोडणे बंधनकारक आहे. या माध्‍यमातुन गेल्‍यावर्षी संबंधित प्‍लान्‍ट अॅण्‍ड मशिनरीची सत्‍यता पडताळणी येऊ शकेल.
 उद्योग आधाराऐवजी आता उद्यम नोंदणी प्रत्‍येक उद्योगासाठी बंधनकारक करण्‍यात आली आहे. उद्योगांनी ती ३१ मार्चच्‍या आत करून घेणे आवश्‍यक आहे. तरी जिल्‍ह्यातील पात्र घटकांनी या सूचनेची नोंद घेऊन आपल्‍या घटकांची उद्यम नोंदणी दि.३१ मार्च २०२१ पावेतो करुन घेण्‍यात याची, असे आवाहन करण्यात आले आहे.                  

Post a Comment

0 Comments