Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वादावादीत सासू मयत तर जावई जखमी

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
सांगली : जिल्ह्यातील आष्टा येथे
पत्नीला नांदायला घेऊन जाण्याच्या कारणातून वादावादी झाली, या दरम्यान, झालेल्या भांडणात लाकडी दांडक्‍याचा मार डोक्‍यात बसल्याने सासू शालन रामचंद्र पाटील (वय ६५, रा. कारंदवाडी, ता. वाळवा) या मयत झाल्या. मारहाण करून पळून जात असताना रस्त्यावर पडून गंभीर जखमी झालेल्या संशयित आरोपी जावई याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी रात्री दिलीप रामचंद्र पाटील यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांत मयत जावई कृष्णा लहू खापरे (वय ४५, रा. बोलोली, ता. करवीर) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगल व कृष्णा या दोघांचे ११ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या दोघांना एक मुलगा व दोन मुली असून, कृष्णा याला दारूचे व्यसन होते. तो मंगल हिच्याबरोबर नेहमीच वाद घालत होता. यामुळे मंगल तिन्ही मुलांसह मार्च महिन्यामध्ये कारंदवाडी येथे आई शालन यांच्या घरी राहण्यास आली होती. शुक्रवारी (ता. ४) दुपारी १२ वाजता मंगलचा पती कृष्णा कारंदवाडी येथे भेटायला आला. रात्री तेथेच मुक्कामाला थांबला. मध्यरात्री कृष्णा, शालन व मंगल यांच्यात भांडण सुरू झाले, यावेळी कृष्णा याने शिव्या दिल्या.
मनीषा, दिलीप व वैभव हे वाद सोडवण्यासाठी गेले असता, कृष्णा हातात लाकडी ओंडका घेऊन मंगल हिला तू नांदायला का येत नाहीस, म्हणून मारहाण करीत होता. मंगलच्या डाव्या हातावर लाकडी दाडक्याने मारले. या दरम्यान आई शालन ही आडवी आल्याने तिच्या डोक्‍याला मार लागला. यामुळे रक्तस्त्राव होऊन त्या बेशुद्ध झाल्या. वैभव, ज्योतीराम ही सर्व कृष्णा याला पकडत असताना तो लाकडी दांडका घेऊन पळाला. यावेळी घरानजिक असणा-या रस्त्यावर तोल जाऊन तो पडल्याने त्याच्या डोक्‍याला जखम झाली. 
या घटनेतील दोघां जखमींना आष्टा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु यावेळी शालन या मयत झाल्या होत्या. तर कृष्णा याला पुढील उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात हलवले. उपचार सुरु असताना सायंकाळी सहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दोन्ही मृत्यू घटनांची नोंद आष्टा पोलिस ठाण्यात झाली आहे. पो.नि. भानुदास निंभोरे तपास करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments