Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गावठी कट्टा बाळगणारा पाथर्डी मिरीत जेरबंद ; एलसीबीची कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी दि.१६ - तालुक्यातील मिरी येथे सापळा लावून गावठी कट्टा बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. आकाश आण्णा धनवटे (वय २३, रा.मिरी, ता.पाथर्डी) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गावठी कट्टा बाळगणारा मिरी (ता.पाथर्डी) बसस्थानक परिसरात फिरत आहे, अशी खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार पो.नि.पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिरी बसस्थानक परिसरात सापळा लावून पंचसमक्ष धनवटे याची अंगझडती घेतली, यावेळी ३०,२०० रू.चे देशी बनावटीचा गावठी कट्टा व एक जिवंत मिळून आल्याने ते जप्त करून, पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पोहेकाॅ मनोज गोसावी, पोना सचिन आडबल, लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, रविकिरण सोनटक्के, पोकाॅ रणजित जाधव, संदिप दरदंले, सागर सुलाने, चापोहेकाँ बाळासाहेब भोपळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments