Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाविकास आघाडी सरकारचा १२,५०० पोलिसांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याचा घेतला निर्णय

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पोलिसांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याचा निर्णय बुधवार (दि.१६) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. या निर्णयानुसार १२,५०० पोलिसांची भरती करण्यात करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना अनिल देशमुख यांनी सांगितलं की, राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात १२ हजार ५०० पदांसाठी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यात येईल. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणींना पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे.
कोरोनाचं संकट आणि लाॅकडाऊनच्या काळामध्ये पोलीस विभागाने अत्यंत महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई वर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे या संवर्गातील १००% टक्के रिक्त पदे भरणं आवश्यक आहे. पोलीस शिपाई गट क संवर्गातील २०१९या भरती वर्षात रिक्त असलेली ५२९७ पदे व २०२० या भरती वर्षात सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामा यामुळे रिक्त होणारी पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण ६७२६ पदे त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२५३८ पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती याआधी अनिल देशमुख यांनी दिली होती.
२०१९ मध्ये अर्ज केलेल्यांना दिलासा
२०१९ मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी ज्यांनी महाआय.टी. पोर्टल मार्फत अर्ज केलेले आहेत. त्या अर्जाबाबतही योग्य ती कार्यवाही केली जाईल. पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, अशा विविध टप्प्यावर पार पडत असल्याने ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहते. त्यामुळे एकाच भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त पदे भरण्याबाबत विभाग विचार करत आहे, असंही अनिल देशमुख यांनी २ महिन्यांआधी सांगितलं होतं.


Post a Comment

0 Comments