Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माजी सैनिकांसाठी डिजीटल इन्फ्रारेड थर्मामीटर व ऑक्सीमीटर मशीन भेट

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या सदस्य असलेल्या माजी सैनिकांसाठी साई माऊली उद्योग समुहाच्या वतीने डिजीटल इन्फ्रारेड थर्मामीटर व ऑक्सीमीटर मशीन भेट देण्यात आली. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना माजी सैनिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी उद्योग समुहाचे प्रदिप काळे, संकेत वाळेकर, श्रीकांत पवार, अमृत वनवे, समाधान दिक्षीत, राहुल गारूळे, विठ्ठल फरतारे, जुगल किशोरी तिवारी, जय हिंद फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, निवृती भाबड, जगन्नाथ जावळे, शिवाजी गर्जे, पी.एस.आय. मारूती भोरे, बाबासाहेब भवर, भरत खाकाळ, भास्कर सिनारे, भाऊसाहेब देशमाने, राजू गट, संजय पटेकर, विठ्ठल लगड आदि उपस्थित होते.


जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिक विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. तर कोरोनाच्या संकटकाळात पोलीसांच्या बरोबर कर्तव्य बजावत आहे. माजी सैनिकांचे कार्य प्रेरणादायी व कौतुकास्पद असून, संपुर्ण जिल्ह्यात माजी सैनिक वृक्षरोपण आणि संवर्धनाचे उपक्रम देखील सुरु आहे. या कोरोनाच्या संकटकाळात आरोग्या संदर्भात जागृक राहण्यासाठी माजी सैनिकांना डिजीटल इन्फ्रारेड थर्मामीटर व ऑक्सीमीटर मशीन भेट देण्यात आल्याचे उद्योजक प्रदिप काळे यांनी सांगितले. फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी मोफत शिबीर घेऊन माजी सैनिकांचे कुटुंबीय व सर्वसामान्य नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली. कोरोनापासून बचाव करण्यासाठी तोंडाला मास्क लावणे व नियमांचे पालन करण्याचे फाऊंडेशनच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments