Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ब्लॅकमेल करून युवतीवर अत्याचार

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.७ :-  नेवासा तालुक्यातील सोनई येथील रहिवासी असलेल्या १८ वर्षीय युवतीचे अपहरण करून आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढून तिलला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यातून समजलेली माहिती अशी, की सोनई येथील हलवाई गल्लीत राहणाऱ्या १८ वर्षे वयाच्या युवतीने फिर्याद दिली आहे.
फिर्यादीने म्हटले आहे की, सन २०१७, २०१८ ते ५ सप्टेंबर २०२० पर्यंत तिला बळजबरीने पळवून नेऊन अपहरण केले राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी,
नाशिक जिल्ह्यातील पंचवटी त इतर ठिकाणी नेऊन तरूणीचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढून तीला ब्लॅकमेल केले. तिच्यावर अत्याचार कले.
या आरोपावरून संशयित आरोपी ऋषिकेश विजय खंडागळे, केशव पनोहर सुद्रिक, संकेत संजय थोरात उर्फ बॉबी, विजय मेघराज खंडागळे, संजय मेघराज खंडागळे व शुभम (पूर्ण नाव ‘पाहीत नाही) या सर्वाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments