Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घरफोड्या करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद ; पाथर्डी पोलिस व एलसीबीची संयुक्त कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१३ - पाथर्डी व नगर तालुका हद्दीत दिवसा घरफोड्या करणा-या सराईत गुन्हेगारांना पोलीसांनी जेरबंद केले. ही कारवाई पाथर्डी पोलिस ठाण्याच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गुरुवारी (दि.१०) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राहात्या घरातील अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम दिवसा घरात प्रवेश करून घरफोडी केल्याची मोहन भाऊसाहेब घालमीक (रा.रघुहिवरे, ता.पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांच्या पथकातील अधिकारी, पोलिस कर्मचारी यांचा तपास चालू असताना, पो.नि पवार यांना पाथर्डीचे पो.नि. रमेश रत्नपारखी यांनी सांगितले की, रघुहिवरे (ता.पाथर्डी) या ठिकाणी संशयितास नागरिकांनी पकडला असून, तो घरफोडीतील आरोपी असण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पो.नि. पवार यांच्या सूचनेनुसार एलसीबी पथकातील सपोनि शिशीरकुमार देशमुख, पोहेकाॅ बाळासाहेब मुळीक, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, पोना सचिन आडबल, रविकिरण सोनटक्के, विशाल दळवी, पोकाॅ कमलेश पाथरूट, मेघराज कोल्हे, रोहित मिसाळ, रणजित जाधव, चापोहेकाँ संभाजी कोतकर आदिचे पथक सदर ठिकाणी गेले असता, पो.नि.रत्नपारखी व पोहेकाॅ चव्हाण व पोकाॅ खोमणे हे तेथे आले. यावेळी पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचा-यांनी संयुक्त संशयित अमोल बाळू वाळके (वय २९, रा.सय्यदमीर लोणी, ता.आष्टी जि.बीड) याला ताब्यात घेतले. यावेळी जमावाने चोरीचा संशय घेऊन मारहाण केलेली होती. त्याला ताब्यात विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने पाथर्डी, नगर तालुका येथे दिवसा घरफोड्या केल्याची कबुली दिली. मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, तीन घरफोडीतील सोन्याचे दागिने हे चिंचोडी पाटील (ता.नगर) येथे जाऊन तेथील सोनार अक्षय सुनिल मिसाळ (वय २५, रा.झारेकरगल्ली, अ.नगर) याला विकल्याचे सांगितले. त्यानुसार सोनार मिसाळ याला पोलिसांनी अटक केली. त्याने अंदाजे १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे ५० ग्रॅम वजनाचे वेगवेगळे सोन्याचे दागिने काढून दिले. त्या दाखविण्याचा पंचनाम करून जप्त करण्यात आले. यानंतर मुद्देमालसह दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.

Post a Comment

0 Comments