Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी सुरेश सुंबे व व्हाईसचेअरमनपदी छत्रपती बोरुडे यांची बिनविरोध निवड

 


खरेदी-विक्री संघ हा शेतकऱ्यांचा दुवा आहे : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : शेतकऱ्यांनी आपल्यावर विश्वास टाकून खरेदी-विक्री संघाची सत्ता दिली. या सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करा. सर्व संचालकांनी एक विचाराने काम करून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे. कोरोना संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सर्वांनी करावे. खरेदी-विक्री संघ हा शेतकऱ्यांचा दुवा आहे. नगर तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी सुरेश सुंबे व व्हाईस चेअरमनपदी छत्रपती बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बोलत होते.
नगर तालुका खरेदीविक्री संघाच्या चेअरमनपदी सुरेश सुंबे व व्हाईस चेअरमनपदी छत्रपती बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले. समवेत चेअरमन अभिलाष घिगे, व्हा. चेअरमन संतोष म्हस्के, संचालक विलास शिंदे, बाळासाहेब निमसे, दिलीप भालसिंग, बाळासाहेब जाधव, संतोष बोथरा, बबन आव्हाड, बन्सी कराळे, रेवन चोभे, शिवाजी कार्ले, प्रा. संभाजी पवार, तुकाराम वाघुले, अंबादास बेरड, डॉ. अनिल ठोंबरे, लक्ष्मण नरवडे, अंबादास शेळके, श्रीकांत जगदाळे, ज्ञानदेव शेळके, केशव अडसुरे, रमेश आगरे, मीराताई बोठे, शारदाताई कराळे, आप्पासाहेब कुलट आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन सुंबे म्हणाले की, सहकारी संस्था या सध्याच्या काळात अडचणीत आहे. अडचणीतून मार्ग काढत शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करु. संघाचा कारभार हा काटकसरीचा व पारदर्श करु. कोरोनाच्या काळामध्ये शेतकरीबरोबर सर्वच अडचणीत आहेत. या अडचणींवर मात करुन संघाचे उत्पादन वाढविले जाईल. तसेच शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे चांगल्या दर्जाचे व माफक दरात मिळवून देणार आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना विश्वासात घेऊन काम करु, असे ते म्हणाले.
व्हाईस चेअरमन छत्रपती बोरुडे म्हणाले की, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आमच्यावर विश्वास टाकून काम करण्याची संधी दिली, त्या संधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले जातील. कामाच्या माध्यमातून आमच्यावर टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवू. असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना बाजार समितीचे चेअरमन अभिलाष घिगे यांनी केले तर आभार प्रदर्शन व्हा. चेअरमन संतोष म्हस्के यांनी मानले.


   

- नगर तालुका खरेदीविक्री संघाच्या चेअरमनपदी सुरेश सुंबे व व्हाईस चेअरमनपदी छत्रपती बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले. समवेत चेअरमन अभिलाष घिगे, व्हा. चेअरमन संतोष म्हस्के, संचालक विलास शिंदे, बाळासाहेब निमसे, दिलीप भालसिंग, बाळासाहेब जाधव, संतोष बोथरा, बबन आव्हाड, बन्सी कराळे, रेवन चोभे, शिवाजी कार्ले, प्रा. संभाजी पवार, तुकाराम वाघुले, अंबादास बेरड, डॉ. अनिल ठोंबरे, लक्ष्मण नरवडे, अंबादास शेळके, श्रीकांत जगदाळे, ज्ञानदेव शेळके, केशव अडसुरे, रमेश आगरे, मीराताई बोठे, शारदाताई कराळे, आप्पासाहेब कुलट आदी उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments