Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेतातील ३ पेटी सोने असल्याची माहितीवरून दरोडा ; आरोपीची कबुली

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
यवतमाळ  : जिल्ह्यातील ढाणकी येथे दि. २९ ऑगस्ट रोजी रात्री शेतातील सालगड्यासह पत्नी व मुलाला शस्त्राने मारहाण करीत, 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना ढाणकी ते खरूस शिवारात घडली होती. परंतु पोलीसांनी चार दिवसांत घटनेचा जलदगतीने तपास करीत १० जणांना अटक केली. या दरम्यान, संशयितांनी शेतामध्ये ३ पेटी सोने असल्याची माहिती मिळाली होती, म्हणून दरोडा टाकला, अशी कबुली पोलिसांना दिली आहे.
विश्‍वनाथ शिंदे (वय २२, रा. उमरी, जि. नांदेड), शुभम अडकीने (वय २१, रा. भोकर), मनोज उर्फ चंद्रकांत मनोरवार (वय ३१, रा. भोकर, जि. नांदेड), विकास परिमल (वय ३९, रा. ढाणकी, जि. यवतमाळ), रामचंद्र संजेवाड (वय १८, रा. भोकर), सूरज सावते (वय २१, रा. पवना, ता. हिमायतनगर), चंद्रकांत सावते (वय २८, रा. पवना), धम्मदीप राऊत (वय २१, रा. पवना), अजय राऊत (वय २०, रा. पवना), नितीन अडुलवार (वय २०, रा. उमरी, ता. हिमायतनगर) अशी पकडण्यात आलेल्याची नावे आहेत. 
ढाणकी ते खरूस रस्त्यावर शेतकरी संजय जिल्हावार यांच्या शेतावरील सालगडी व त्याचे कुटुंब राहत होते. २९ ऑगस्ट रोजी सालगडी, पत्नी व मुलाला शस्त्राचा धाक दाखवून मारझोड करून २० हजार रुपये किंमतीचे सोने लुटून नेलं. यावेळी सालगड्यास विहिरीमध्ये ढकलून दिले होते. सालगडी नागोराव वामन डहाके यांनी बिटरगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली. यावरून गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला. 
जिल्हावार यांच्या शेतात ३ पेटी सोने असल्याची माहिती ढाणकी येथील विकास परिमल याने चंद्रकांत सावते यास दिली. यानंतर साथीदार एकत्र करून जिल्हावार यांच्या शेतात दरोडा टाकला. मात्र, हाती काहीच लागले नाही. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनेचा तपास लावून १० जणांना अटक केली. दरोड्यात वापरण्यात आलेले वाहन, तलवार, चाकू, मोबाईल असा एकूण १० लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
विशेष म्हणजे या गुन्ह्यात कलम 397 भादंवि वाढविण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, प्रभारी एसडीपीओ बागबान यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, उपनिरीक्षक नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, संदीप चव्हाण, ठाणेदार विजय चव्हाण, पीएसआय जायभाये, खामकर, गीते, चव्हाण यांनी केली.

 
👉एकञित कसे आलेतं !
ढाणकी गावाचे विकास परिमल आणि चंद्रकांत सावते ही दोघे जेसीबी व्यवसायामध्ये आहेत. जिल्हावार यांच्या शेतात सोने असल्याची माहिती परिमल याने चंद्रकांत याला माहिती दिली होती. यानुसार साथीदार एकत्रित केले. या प्रकारे या प्रकरणात विदर्भ-मराठवाडा कनेक्शन जुळून आले.

👉दोन महिन्यांपासून होती शोध मोहिम....
शेतात सोने असल्याची माहिती परिमल याने दोन महिन्यांपूर्वीच चंद्रकांत याला दिली होती. तेव्हापासून चंद्रकांत जिल्हावार यांच्या गोठ्यावर पाळत ठेवून होता. त्याने नांदेड जिल्ह्यातील पवना, भोकर, उमरी या गावांतील साथीदारांची जुळवाजुळव केली. त्यांनी कडब्याची सुडी उकलून धनाचा शोध घेतला. मात्र, हाती काहीच लागले नाही.

Post a Comment

0 Comments