Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विहित मुदतीत शासकीय कर्मचाऱ्यांना माहितीकोष अद्यावयत करण्याची कार्यवाही करण्याचे आवाहनऑनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
पुणे दि.4: - महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्याकडील कर्मचा-यांची दि. 1 जुलै 2020 या संदर्भ दिनांकास अनुसरुन सेवा विषयक व वेतन विषयक माहिती hhps://mahasdb.maharashtra.gov.in/CGE या वेबसाईटवर ऑनलाईन अद्ययावत करावयाची आहे व याकरिता पुणे जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना संगणकीय आज्ञावलीचे Username व Password जिल्हा सांख्यिकी कार्यालय,पुणे यांच्याकडून यापुर्वीच उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. माहिती अद्ययावत केल्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र जिल्हा सांख्यिकी अधिकारी,पुणे यांच्याकडून प्राप्त करुन घेऊन माहे डिसेंबर 2020 देय जानेवारी 2021 वेतन देयकासोबत व माहिती बरोबर असल्याबाबतचे दुसरे प्रमाणपत्र माहे मार्च 2021 देयक एप्रिल 2021 च्या वेतन देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयाची वेतन देयके कोषागार कार्यालयांनी पारित करण्यात येऊ नये अशा सूचना नियोजन विभाग यांचेकडील दि. 27 ऑगस्ट 2020 च्या शासन परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी उपरोक्त सूचनांनुसार नोंद घ्यावी व विहित मुदतीत शासकीय कर्मचाऱ्यांना माहितीकोष अद्यावयत करण्याची कार्यवाही करावी असे, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, पुणे यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments