Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

" विसर्जन रथ आपल्या दारी" अहमदनगर शहर पोलिसांचा अनोखा उपक्रम "

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर दि.१-कोराना या संसर्गजन्य आजार नियंत्रीत ठेवण्याकरीता भारत सरकार, महाराष्ट्र सरकार,अहमदनगर जिल्हा प्रशासन व अहमदनगर जिल्हा पोलीस दल दिवस - रात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करुन स्वत:च्या जिवाची काळजी न करता अहोरात्र काम करत आहेत.
दि.१सप्टेंबरला अहमदनगर शहर व परिसरातील नागरिक श्री.गणेश विसर्जन दरम्यान मोठ्या प्रमाणात एकत्र येण्याची शक्यता असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांचे मार्गदर्शनाखाली व सूचनाप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, कोतवाली पो.नि. प्रविण लोखंडे, तोफखाना पो.नि. एचपी मुलानी यांनी अहमदनगर शहरातील मानाचे विशाल गणपती, संगम मित्र मंडळ, माळीवाडा तरुण मंडळ, आदिनाथ तरुण मंडळ, दोस्ती मित्र मंडळ, नवजवान तरुण मंडळ, महालक्ष्मी तरुण मंडळ, कपिलेश्वर मित्र मंडळ, नवरत्न मित्र मंडळ, समझोता तरुण मंडळ, निलकमल मित्र मंडळ, शिवशंकर तरुण मंडळ व सार्वजनिक श्री.गणेश मंडळ, तसेच घरातील श्री.गणेश विसर्जनासाठी 'श्री.गणेश विसर्जन रथ आपल्या दारी' हा उपक्रम राबविला. अहमदनगर शहरातील मानाचे व इतर सार्वजनिक श्री.गणेश मूर्ती अहमदनगर शहर पोलिसांनी पोलिस वाहनामध्ये संकलित करून विसर्जन केले. तसेच शहरातील इतर इतर श्री.गणेश मंडळ व घरातील. श्री. गणेश मूर्ती वेगवेगळ्या वाहनांना मध्ये संकलित करून विसर्जन करण्यात आले.
अहमदनगर शहर पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments