ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२- नगर तालुक्यातील रांजणी माथनी परिसरात गेल्या सात ते आठ दिवसांपासून एक बिबट्या धुमाकुळ घालीत असून ७ ते ८ शेळयाफस्त केल्या आहेत.
बुधवारी पहाटेच्या सुमारास या बिबट्याने हरिभाऊ थोरात यांच्या गायी वर हल्ला केला मात्र थोरात यांनी बिबट्याला दगड मारून प्रतिकार करीत पिटाळून लावले व गायीची सुटका केली. याबाबत दिनकर थोरात यांनी वनविभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली आहे पुढील तपासा साठी कर्मचारी गावात पोहचले असून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
0 Comments