Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मध्य रेल्वे पाळणार “स्वच्छता पखवाडा -२०२०”

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
भारतीय रेल्वेवर दि. १६.९.२०२० ते ३०.९.२०२० पर्यंत 'स्वच्छता पखवाडा -२०२०' साजरा करण्यासाठी स्थानक, गाड्या, कार्यालये, वसाहती, कार्यशाळा, देखभाल डेपो, रुग्णालये इ. ठिकाणी पंधरवड्याची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेने या पंधरवड्या दरम्यान गृहराज्य मंत्रालयाने जारी केलेल्या कोविड -१९ संबंधित सर्व खबरदारी/प्रोटोकॉल व मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत विविध उपक्रम राबविण्यास तयार झाले आहे. हा ‘स्वच्छता पखवाडा -२०२०’ मुख्यालय व सर्व विभागीय स्तरावर स्वच्छता जागृतीसाठी आपापल्या कामाच्या ठिकाणी सफाई कर्मचार्यांसह अधिकारी व कर्मचार्‍यांना ‘स्वच्छता प्रतिज्ञा’ देण्यापासून सुरू होईल.
या मोहिमे दरम्यान मध्य रेल्वे स्वच्छ जागृती (प्रतिज्ञा), स्वच्छ संवाद, स्वच्छ स्टेशन, स्वच्छ रेलगाडी (गाड्या), स्वच्छ परीसर (फिरणारे क्षेत्र), स्वच्छ आहार (खाद्यपदार्थ), स्वच्छ नीर (पेयजल), अशा विविध उपक्रम राबविणार आहे. स्वच्छ प्रसाधन (स्वच्छतागृहे) आणि स्वच्छ प्रतियोगिता (स्पर्धा) इ. या उपक्रमांमध्ये रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्तेही सहभागी होतील.
--- ---- ----
दिनांक: १५ सप्टेंबर २०२०
प्रप क्रमांक: 2020/09/26
सदर प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments