Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सकारात्मक दृष्टीकोनातून काम करावे : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

 


शुभम भांबरे यांची नगर तालुका भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.९ : भाजप संघटना बांधणीचे पद हे शोभेचे नाहीतर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. तरुणांचा ओढा दिवसेंदिवस राजकीय क्षेत्राकडे वळत आहे. राजकारणात परिवर्तन घडविण्याचे काम युवक करतो. युवकाने सामाजिक बांधिलकी जोपासून समाजातील प्रश्न सोडविण्याचे काम करावे. सकारात्मक दृष्टीकोनातून काम केल्यास राजकारणात यश संपादन होत असते. ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग युवकांनी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी करावे. भाजपाचे विचार प्रत्येक युवकाने गावपातळीवर घेऊन जाण्याचे काम करावे. नगर तालुका भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी शुभम भांबरे यांची निवड झाली आहे. त्यांनी पक्ष संघटना वाढीबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासावी. पद हे लग्न पत्रिका व लेडरपॅडवर छापण्यापूर्ते मर्यादित न ठेवता समाजाची नाळ जोडण्याचे काम युवकांनी करावे. नगर तालुक्‍यात भाजपा पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी युवकांची फळी उभी करावी, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
नगर तालका भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी शुभम भांबरे यांना निवडीचे पत्र देताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले. समवेत युवाचे मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अक्षय कर्डिले, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, विलास शिंदे, प्रभाकर भांबरे, रेवन चोभे, दिलीप भालसिंग, वसंत सोनवणे, शिवाजी कार्ले, उद्धव कांबळे, बाबासाहेब जाधव, सुधीर भापकर, बाळासाहेब मेटे, बाळासाहेब खाकाळ, बबनराव आव्हाड, दत्तात्रय शेळके, हर्षवर्धन शेळके, देविदास मोरे, अंकुश नवसुपे, राजू दारकुंडे, गणेश भालसिंग आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी गावपातळीवर विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करुन माहिती देण्याचे काम करणार आहे. युवकांच्या माध्यमातून नगर तालुक्यामध्ये भाजपा पक्षाचे संघटन मजबूत करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी शुभम भांबरे म्हणाले की, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला भाजपा तालुका युवा मोर्चाचे पद देऊन सन्मान केला. या पदाच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीबरोबर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणार आहे.
माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. पक्षाला साजेसे असे काम आम्ही सर्व युवक करणार आहोत, असे ते म्हणाले.
नगर तालका भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी शुभम भांबरे यांना निवडीचे पत्र देताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले. समवेत युवाचे मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अक्षय कर्डिले, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, विलास शिंदे, प्रभाकर भांबरे, रेवन चोभे, दिलीप भालसिंग, वसंत सोनवणे, शिवाजी कार्ले, उद्धव कांबळे, बाबासाहेब जाधव, सुधीर भापकर, बाळासाहेब मेटे, बाळासाहेब खाकाळ, बबनराव आव्हाड, दत्तात्रय शेळके, हर्षवर्धन शेळके, देविदास मोरे, अंकुश नवसुपे, राजू दारकुंडे, गणेश भालसिंग आदी उपस्थित होते. (छाया : लहू दळवी)

Post a Comment

0 Comments