Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लॉकडाऊन मुळे लग्नाचा खर्च कमी झाला आहे,असे म्हणून विवाहितेस मारहाण ; माहेराहून १० लाख रुपये आणण्याची मागणी सासू-सासरेसह ९ जणांवर गुन्हा दाखल

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
बार्शी, दि.१४- लॉकडाऊन काळामध्ये तुझ्या बापाने लग्न केल्यामुळे तुमचे खूप पैसे वाचले आहेत. त्यामुळे तुझ्या वडिलांची पैशाची खूप बचत झाली आहे.  तू आता तुझ्या वडिलाकडुन तुझ्या नवऱ्याच्या उद्योगधंद्यासाठी १० लाख रुपये आणून दे, असा तगादा सासू-सासरे व घरातील मंडळींनी लग्न झाल्यापासून ७ दिवसातच मानसिक त्रास देऊन विवाहिततेस माहेरी पाठवले. याप्रकरणी  ९ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
  याबाबत समजलेली माहिती अशी की,  विवाहित महिलेस ७ दिवस झाले नाहीत, तोच माहेरून १० लाख रुपये आणण्याची मागणी करून जाच होत असल्यामुळे  नमिरा  वसीम  पटेल ( रा. परंडा, ह.मु.  बालाजी कॉलनी, बार्शी ) या विवाहितेने घरातील पती वसीम मजीत पटेल, सासू सालेहा मजीत पटेल, सासरे मजीत हमिद पटेल, नणंद मजिना मजिद पटेल हे (सर्वजण रा. पटेल कॉम्प्लेक्स बार्शीरोड, परांडा जि. उस्मानाबाद), चुलत सासरे दादा मिया हमीद पटेल, चुलत सासू तसलीम दादा मिया पटेल (रा. नागणे प्लॉट बार्शी ), जाफर काझी ( मौलाना ), मुनेरा जफर काजी, अक्सा जफर काझी (रा. पल्ला मशिदजवळ मंगळवार पेठ ता. परंडा जिल्हा उस्मानाबाद) या ९ जणाविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले आहे कि, माझे लग्न माझ्या वडिलांनी लॉकडाऊन मध्ये ३१ मे रोजी घरीच मोजक्या लोकांच्या उपस्थित लावण्यात आले  लग्नामध्ये माझ्या वडिलांनी वरदक्षिणा म्हणून ५ लाख रुपये रोख व ११ तोळे सोने आणि दिवान व कपाट घेण्यासाठी ५१ हजार रुपये रोख वेगळे दिले आहेत.
    तरीदेखील या मंडळींनी लग्नाच्या दुसऱ्या दिवशा पासूनच माझा जाच् सुरू केला. तुझ्या वडिलांनी लॉक डाऊनमध्ये लग्न उरकून घेतल्यामुळे माझे लग्न साध्या पद्धतीत झाले आहे. त्यामुळे तुझ्या वडिलांचा खूप पैसे वाचला आहे. तू आणखीन १० लाख रुपये तुझ्या वडिलांकडून तुझ्या नवऱ्याच्या व्यवसायासाठी घेऊन ये तरच तुला आम्ही नांदणार नसता तुला तलाक देऊ असे, म्हणून मला मारहाणही केली आसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments