Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार छावणी परिषद क्षेत्रात दुकानदारांना कोरोना चाचणी प्रमाणपत्र अनिवार्य : विद्याधर पवार

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
भिंगार : अहमदनगर छावणी परिषद क्षेत्रातील सर्व भाजीविक्रेते. फळविक्रेते , खाद्यपदार्थ विक्रेते , इतर सर्व व्यावसायिक व दुकानदार यांनी पूर्वपरवानगी शिवाय कोणतीही व्यवसाय सुरू करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी माहिती छावणी परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी दिली.
प्रत्येकाने आपली व आपल्या दुकानालील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी डॉ . बी आर आंबेडकर कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन करून घ्यावी व चाचणी केलेचे प्रमाणपत्र आपल्या दुकानात ठेवणे अनिवार्य आहे. जे कोणी भाजीविक्रेते, फळविक्रते, खाद्यपदार्थ विक्रेते इतर सर्व व्यावसायिक व दुकानदार कोरोना चाचणी करणार नाहीत त्यांना दुकान चालू ठेवण्याची परवानगी मिळणार नाही व जर प्रमाणपत्राशिवाय दुकान / व्यवसाय चालू असलेचे आढळून आल्यास दुकान सील करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे, छावणी परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments