Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आधुनिक साहित्य असलेल्या कोविड सेंटरची गरज : आ. संग्राम जगताप

 


साईनाथ कोविड सेंटरचे उद्घाटन

ऑनलाईन न्यूज नेटवर्क / नगर रिपोर्टर 

अहमदनगर : प्रत्येकाने मानवतेच्या भावनेतून कोरोना रुग्णांची सेवा करावी. कोरोना संसर्ग विषाणू असल्यामुळे नागरिकांत मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. नगर शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या रोगाला थांबविण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. नागरिकांनी भीती न बाळगता आपल्या आरोग्याची तपासणी करुन उपचार घ्यावे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नियमांचे व अटींचे पालन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रत्येकाने मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचे वापर करणे आवश्यक आहे. शहरामध्ये विविध सामाजिक संस्थांनी पुढे येऊन कोविड सेंटर सुरु केले आहे. लक्षण असणाऱ्यांसाठी स्टेनशरोडवरील साईनाथ कोविड सेंटरच्यावतीने अत्याधुनिक साहित्याच्या सहाय्याने ऑक्सिजन, व्हेंटिलीटरचे २१ बेड असलेल्या सेंटरची व्यवस्था केली आहे. याची खरी गरज जाणवत होती, ती साईनाथ कोविड सेंटरने पूर्ण केली आहे. कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनसाठी विविध हॉस्पिटलमध्ये फिरावे लागत आहे. यासाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची खरी गरज आहे, ती या सेंटरने पूर्ण केली आहे. शहरातील विविध नामांकित डॉक्टरांनी एकत्र येऊन हे सेंटर सुरु केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
स्टेशन रोडवरील साईनाथ कोविड सेंटरच्यावतीने लक्षणं असणाऱ्यांसाठी २१ बेडचे कोविड सेंटरचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, न्यूरो सर्जन डॉ. प्रशांत जाधव, डॉ. रोहित करांडे, डॉ. तुषार कोहक, डॉ. बाळासाहेब गाडे, डॉ. वैभव गाडे, डॉ. गणेश गोपनर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना न्यूरोसर्जन डॉ. जाधव म्हणाले की, आम्ही सर्व डॉक्टर एकत्र येऊन सामाजिक भावनेतून साईनाथ कोविड सेंटरने आधुनिक उपक्रमाच्या सहाय्याने ऑक्सिजन व्हेंटिलीटरची गरज असणाऱ्या कोविड रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला व हे कोविड सेंटर सुरु केले आहे. सेवा देण्याच्या भावनेतून आम्ही काम करणार आहोत, असे ते म्हणाले.
यावेळी डॉ. बाळासाहेब गाडे म्हणाले की, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे, काही रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलीटरची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही हे कोविड सेंटर सुरु केले आहे. कोरोना रुग्णांना आधार व दिलासा देण्याचे काम साईनाथ कोविड सेंटर करणार असल्याचे ते म्हणाले. 


अहमदनगर : स्टेशन रोडवरील साईनाथ कोविड सेंटरच्यावतीने लक्षणं असणाऱ्यांसाठी २१ बेडचे कोविड सेंटरचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, न्यूरो सर्जन डॉ. प्रशांत जाधव, डॉ. रोहित करांडे, डॉ. तुषार कोहक, डॉ. बाळासाहेब गाडे, डॉ. वैभव गाडे, डॉ. गणेश गोपनर आदी उपस्थित होते. (छाया : लहू दळवी)

Post a Comment

0 Comments